परभणी : दुधना नदीपात्रातून अवैध वाळूउपसा जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:24 AM2019-02-14T00:24:08+5:302019-02-14T00:24:19+5:30

तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाळूतस्करांचे फावत आहे़

Parbhani: Invalid slurry from Dudhna river belt | परभणी : दुधना नदीपात्रातून अवैध वाळूउपसा जोरात

परभणी : दुधना नदीपात्रातून अवैध वाळूउपसा जोरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाळूतस्करांचे फावत आहे़
तालूक्यातील काजळी रोहिणा परिसरातील दुधना नदी पात्रातून अनेक दिवसांपासून रात्रंदिवस वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनधास्तपणे वाहतूक केली जात आहे. वाळूच्या उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नदीपात्राचे वाळवंट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाळूचा अवैध उपसा होत असल्याने पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
रोहिणा शिवारातून दररोज १० ते १२ ट्रॅक्टरच्या साह्याने वाळूची वाहतूक होत आहे़ यामुळे शासनाच्या लाखोंच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे़ वाळूची चोरटी वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगात चालविली जातात. त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे ये-जा करणाºया ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू असून, एक ब्रास वाळू अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू तस्करांची हिंमत वाढत आहे.
रोहिणा येथील सरपंच व सदस्य यांनी वाळू उपसा बंद करण्याची मागणी निवेदनाव्दारे वारंवार करूनही त्याचा उपयोग झाला नाही. महसूल विभागाने वाळू उपसा रोखण्यासाठी पथके नेमूनही हा प्रकार बंद होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
विभागीय आयुक्तांना निवेदन
काजळी रोहिणा परिसरातील दुधना नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार होणारा उपसा थांबवावा, अशी मागणी सरपंच ज्योती काष्टे व दोन सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.
कारवाईसाठी तीन पथके नियुक्त
अवैधरीत्या वाळूचा उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने तीन पथकांची स्थापना केली आहे़ यासंदर्भात कारवाई केली जात आहे, अशी प्रतिक्रिया तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
नदीपात्राचे होत आहे वाळवंट
सेलू, मानवत व परभणी तालुक्यातून वाहणाºया नदीपात्रात यावेळेस अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीसाठाच शिल्लक नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उघडी पडली आहे़ याचा फायदा घेत अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे़ महसूल पथकाने जरी तीन पथके कारवाईसाठी नियुक्त केली असले तरी या पथकांकडून होणारी कारवाई ही तकलादू असल्याने याचा परिणाम वाळू तस्करांवर होताना दिसत नाही़ कारवाई करून मोकळे होणाºया महसूल विभागाच्या भूमिकेमुळे वाळूमाफियांना रान मोकळे सुटले आहे़ त्यामुळे दुधना नदीपात्राचे वाळवंट होत आहे़

Web Title: Parbhani: Invalid slurry from Dudhna river belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.