परभणी: इरळदची जि.प. शाळा झाली आंतरराष्ट्रीय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:29 AM2019-03-13T00:29:34+5:302019-03-13T00:29:48+5:30

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या १५२ पैकी निवडलेल्या ५ शाळांचे मूल्यांकन करून जागतिक महिला दिनी मानवत तालुक्यातील इरळद येथील जि.प. प्राथमिक शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा बहाल केला आहे. टप्या टप्याने या शाळांना विशेष तरतूद उपलब्ध करून भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे.

Parbhani: Irraldi district School turns international! | परभणी: इरळदची जि.प. शाळा झाली आंतरराष्ट्रीय !

परभणी: इरळदची जि.प. शाळा झाली आंतरराष्ट्रीय !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या १५२ पैकी निवडलेल्या ५ शाळांचे मूल्यांकन करून जागतिक महिला दिनी मानवत तालुक्यातील इरळद येथील जि.प. प्राथमिक शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा बहाल केला आहे. टप्या टप्याने या शाळांना विशेष तरतूद उपलब्ध करून भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे.
मानवत तालुक्यातील इरळद शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आदर्श लोकसहभाग, सुसज्ज इमारत, शाळेचा परिसर, क्रीडांगण, अद्ययावत स्वतंत्र स्वच्छतागृह, फिल्टर पाणीपुरवठा, हॅन्ड वॉश स्टेशन, बोलक्या भिंती, डिजिटल वर्गखोल्या, एबीएल पद्धतीची पाहणी पथकाद्वारे करण्यात आली.
इरळद शाळेचा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारी पॅटर्न, विविध स्पर्धा परीक्षा तयारी वर्ग आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा आलेख, शाळेची पट व उपस्थिती, रोपवाटिका, कचरा व्यवस्थापन, सुंदर बगीचा, सुसज्ज प्रयोगशाळा, माझे वाचनालय, विद्यार्थी बचत बँक, रात्र अभ्यासगट, झांजपथक असे अनेक उपक्रम प्रभावित करणारे ठरले. शालेय व्यवस्थापन समितींतर्गत आदर्श कामकाज, ग्रामपंचायत इरळद मार्फत शाळेत झालेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याच बरोबर ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद, शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक यांच्या आंतरक्रिया आदींचे परीक्षण करण्यात आले.
मागील आठ ते दहा वर्षात लोकसहभागातून शाळेत जवळपास २२ लाख रुपये लोकवर्गणीद्वारे जमीन खरेदीसह शाळेत आदर्श कामे करण्यात आली. ग्रामस्थांचे शाळेविषयी असणारे प्रेम व समपर्णाची भावना पाहून पथक भारावून गेले होते. सलग अकरा वर्षात २० विद्यार्थी नवोदय धारक तर २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
या उपक्रमातूनच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संलग्नतेसाठी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यात उपयुक्त ठरला. त्यामुळे जून २०१९ पासून इरळदच्या शाळेत पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध होणार आहे. याचा लाभ या शाळसोबत शेजारील दहा ते पंधरा गावांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील वंचित घटकाला हक्काचे, दर्जेदार, शिक्षण मिळणार आहे.
दहावीच्या वर्र्गालाही मिळाली मान्यता
४पुढील वर्षापासून शाळेत नववी ते दहावी वर्ग सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इरळद येथील शाळेला विशेष शासकीय निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. शाळेला प्राप्त झालेल्या घवघवीत यशाच्या बहुमानाला येथील आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांची मागील १५ वर्षांची कठोर मेहनत, जिद्द आणि लोकसहभागासह योग्य मार्गदर्शन ही त्रिसूत्री यशाचे गमक ठरली आहे.
परभणी जिल्ह्यातील इतर शाळांसमोर दैदिप्यमान आदर्श ठेवला आहे. इरळद गावासह मानवत पंचायत समिती आणि परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक उत्कर्षाचा गौरव इरळद शाळेने राज्यस्तरावर दिमाखात वाढवला आहे. याबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

Web Title: Parbhani: Irraldi district School turns international!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.