परभणी : नगरसेविका जाहेदा बेगम यांचे जात प्रमाणपत्र रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:06 AM2018-10-12T00:06:52+5:302018-10-12T00:08:26+5:30
येथील प्रभाग क्रमांक ७ मधील कॉंग्रेसच्या नगरसेविका जाहेदा बेगम इब्राहीम यांचे इतर मागासप्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील प्रभाग क्रमांक ७ मधील कॉंग्रेसच्या नगरसेविका जाहेदा बेगम इब्राहीम यांचे इतर मागासप्रवर्गाचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे.
परभणी येथील प्रभाग क्रमांक ७ मधून जाहेदा बेगम इब्राहीम/ जाहेदा शेख रहेमान या इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेमधून कॉंग्रेसच्या तिकीटावरुन मनपाच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. विजयानंतर त्यांनी सहा महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नव्हते. या संदर्भात त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर समितीने नुकताच निकाल दिला असून त्यामध्ये नगरसेविका जाहेदा बेगम इब्राहीम यांचे इतर मागासप्रवर्गाचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे आता त्यांचे मनपाचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. यापूर्वी कॉंग्रेसचे प्रभाग क्रमांक ११ मधील सदस्य अ.नईम यांचेही सदस्यत्व याच कारणामुळे रद्द झाले आहे.