परभणी जि़प़ने बदलली सव्वा चौदा कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:59 PM2020-03-20T22:59:47+5:302020-03-20T23:00:27+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतील तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे जिल्हा परिषदेने बदलली असून, या बदलास पालकमंत्री नवाब मलिक यांची मंजुरी घेण्यात आली आहे़
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला विविध विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असतो़ या निधीअंतर्गत कामांचे आराखडे तयार करून ते जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर केले जातात़ त्यानंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती या आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीकोणातून जिल्हा परिषद प्रशासन कारवाई करते़ ही प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा परिषदेने अनेक कामांना मंजुरी मिळविली होती; परंतु, जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाले़ शिवाय पालकमंत्र्यांमध्ये बदल झाला़
त्यामुळे नव्याने आलेल्या पदाधिकाºयांचे प्राधान्य बदलले व त्यानुसार त्यांनी कामांमध्येही बदल करण्याचा निर्णय घेतला़ २५ जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला़ त्या प्रस्तावास पालकमंत्री नवाब मलिक यांनी मंजुरी दिली़ त्यानुसार जिल्हा परिषदेने तब्बल १३ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांची कामे बदलली आहेत़ '
त्यामध्ये २०१९-२० मधील ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान या अंतर्गत १९ लाखांची ४ कामे, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदानांतर्गत ४४ लाख ५० हजारांची ४ कामे, लघु सिंचन विभागांतर्गत ७३ लाख रुपयांची ५, लघु पाटबंधारे विभागांतर्गत सिमेंट बंधाºयांची ६३ लाखांची १३, कोल्हापुरी बंधाºयाची १ कोटी ४६ लाखांची ९, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरणांतर्गत १ कोटी ५९ लाख रुपयांची ८ कामे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र देखभाल दुरस्तीचे ८ लाख ५० हजार रुपयांची दोन कामे, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम व विस्तारीकरण याचे ६ कोटी ५० लाख रुपयांचे काम तसेच शाळा दुरुस्ती बांधकाम व वर्गखोलीची १६ लाखांची ३ कामे, अंगणवाडी बांधकामाची ३४ लाखांची ३, इतर जिल्हा व रस्ते विकास मजबुतीकरणाची ६३ लाखांची ४, पंचायत समिती लेखाशिर्षाअंतर्गत ५१ लाखा १३ कामे, शाळा दुरुस्ती, वर्ग खोल्या बांधकाम आदीची १ कोटी ४१ लाखांची २८ आणि रस्ते विकास व मजबुतीकरणांतर्गत १० लाख २५ हजार रुपयांचे १ अशा एकूण ९९ कामांमध्ये बदल करण्यात आला आहे़
इतिवृत्त झाले तयार
४जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या तब्बल १४ कोटी १९ लाख २५ हजार रुपयांच्या कामांमध्ये बदल केल्यानंतर त्यास २५ जानेवारीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती़ या अनुषंगाने तयार करण्यात आलेले इतिवृत्त १२ मार्च रोजी समितीच्या सदस्यांना पाठविण्यात आले़ त्यामुळे तब्बल ४७ दिवस या बैठकीचे इतिवृत्त तयार करण्यास प्रशासनास वेळ लागल्याचे समोर आले आहे़ साहजिकच बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली असली तरी त्यामध्ये करण्यात येणारे बदल हे नंतरही निश्चित केले जातात़ त्यानंतरच या संदर्भातील इतिवृत्त तयार करण्यात येते़