परभणी: विठू माऊलीच्या गजराने आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:38 AM2019-07-13T00:38:47+5:302019-07-13T00:39:33+5:30
पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग उभ्या महाराष्ट्राच्या मनीमाणसी घर करुन आहे. याचा प्रत्यय पिढ्यान् पिढ्या आषाढी- कार्तिकीच्या वेळी प्रत्येकाला येत असतो. असाच काहीसा प्रत्यय शुक्रवारी जिल्हाभरात आषाढी एकादशीनिमित्त अबालवृद्ध भाविकांचा उदंड उत्साह पाहून आला. या निमित्ताने भाविकांच्या वतीने दिंडी काढण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ‘ पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग उभ्या महाराष्ट्राच्या मनीमाणसी घर करुन आहे. याचा प्रत्यय पिढ्यान् पिढ्या आषाढी- कार्तिकीच्या वेळी प्रत्येकाला येत असतो. असाच काहीसा प्रत्यय शुक्रवारी जिल्हाभरात आषाढी एकादशीनिमित्त अबालवृद्ध भाविकांचा उदंड उत्साह पाहून आला. या निमित्ताने भाविकांच्या वतीने दिंडी काढण्यात आली होती.
परभणी शहरातील माळीगल्ली येथील मारोती मंदिर येथे सकाळी विविध शाळांमधील विद्यार्थी जमा झाले. येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ८ वाजता गोपाळ दिंडीला सुरुवात झाली. नारायण चाळ, गुजरी बाजार, गांधी पार्क, शिवाजी चौक, शिवाजी रोडमार्गे विद्यानगरातील माऊली मंदिरात या दिंडीचा समारोप झाला. या दिंडीत विठ्ठल-रुखमाईचे सजीव देखावे सादर करण्यात आले होते. चिमुकल्यांनी विविध वेषभूषा परिधान केल्या होत्या. शहरातील गुजरी बाजारात पालखी पोहचल्यानंतर येथे पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रिंगण सोहळा पार पडला. हा रिंगण सोहळा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. यानिमित्त विविध राजकीय व सामाजिक संस्थांच्या वतीने दिंडीतील भाविकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विहिंपचे प्रांतमंत्री अनंत पांडे, सुरेंद्र शहाणे, संप्रिया पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, सचिन देशमुख, विजय जोशी, समीर दुधगावकर, अंबिका डहाळे, प्रल्हाद कानडे, राजकुमार भामरे, सुनील रामपूरकर, श्यामसुंदर कुलकर्णी, गोपाळ रोडे, श्यामसुंदर शहाणे, अभिजीत कुलकर्णी, सचिन कोमलवार, गणेश काळबांडे, प्रसाद कुलकर्णी, मनिष देशपांडे आदींची उपस्थिती होती.