परभणी :जायकवाडीच्या पाण्यासाठी कार्यालयास ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:43 AM2018-10-25T00:43:21+5:302018-10-25T00:43:42+5:30

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़

Parbhani: Keep the office closed for Jayakwadi water | परभणी :जायकवाडीच्या पाण्यासाठी कार्यालयास ठोकले टाळे

परभणी :जायकवाडीच्या पाण्यासाठी कार्यालयास ठोकले टाळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़
जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा परभणी तालुक्यातून प्रवाही झाला आहे़ सध्या या कालव्याला पाणी सोडण्यात आले़ मात्र कालव्याच्या ६७ क्रमांकाच्या वितरिकेला पाणी सोडले नव्हते तर ६४ क्रमांकाच्या वितरिकेला कमी पाणी सोडल्याने हे पाणी टेलपर्यंत पोहचत नव्हते़ परिणामी शेतकºयांची मोठी गैरसोय होत होती़ जायकवाडीच्या कालव्याचे पाणी मिळावे, यासाठी २४ आॅक्टोबर रोजी बाजार समितीचे माजी सभापती गणेश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठले़ यावेळी कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने संतप्त शेतकºयांनी सकाळी ११ वाजता कार्यालयास कुलूप ठोकले़
दरम्यान, गणेश घाटगे यांनी या प्रश्नी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्याशी चर्चा केली़ त्यांच्या सुचनेनंतर अधिकाºयांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले़ दुपारी १ वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंत्यांनी ६४ क्रमांकाच्या वितरिकेला जास्त क्षमतेने पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले तर ६७ क्रमांकाच्या वितरिकेलाही पाणी देण्याचे त्यांनी मान्य केले़ दुपारपर्यंत पाणीही सोडण्यात आले़ ६४ क्रमांकाच्या वितरिकेला ८० क्युसेसवरून १३० क्युसेस पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले़
या आंदोलनात माळसोन्ना, धसाडी, पोरवड, ठोळा, दामपुरी, आंबेटाकळी, इंदेवाडी, ब्रह्मपुरी, साळापुरी, पेगरगव्हाण, दैठणा आदी गावांमधील शेतकरी सहभागी झाले होेते़ त्यात गणेश घाटगे यांच्यासह मधुकर लाड, प्रल्हादराव लाड, तुकाराम गिराम, विठ्ठल पुर्णे, भगवान पुर्णे, प्रभाकर महाजन, मनिषा चव्हाण, शेख दाऊद, संजय लाड, शंकर जाधव, भगवान भिसे, अर्जुन जाधव, पांडूरंग लाड, बाळासाहेब टेकाळे आदींचा समावेश होता़

Web Title: Parbhani: Keep the office closed for Jayakwadi water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.