परभणी : देखभाल दुरुस्तीअभावी रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:36 AM2018-10-30T00:36:52+5:302018-10-30T00:38:32+5:30

तालुक्यातील मुख्य रहदारीच्या राज्य रस्त्यासह जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गतवर्षी काम करणाऱ्या कंत्राटदारांना या वर्षी या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असताना केवळ पूर्णा ते नांदेड या रस्त्यावर दुुरुस्तीचे काम सुरू आहे. तर उर्वरित रस्त्यांकडे मात्र कंत्राटदारांनी दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना सध्या तरी खड्यातून मार्ग काढावा लागत आहे.

Parbhani: Khadeck Khade on the road due to lack of maintenance | परभणी : देखभाल दुरुस्तीअभावी रस्त्यावर खड्डेच खड्डे

परभणी : देखभाल दुरुस्तीअभावी रस्त्यावर खड्डेच खड्डे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): तालुक्यातील मुख्य रहदारीच्या राज्य रस्त्यासह जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. गतवर्षी काम करणाऱ्या कंत्राटदारांना या वर्षी या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असताना केवळ पूर्णा ते नांदेड या रस्त्यावर दुुरुस्तीचे काम सुरू आहे. तर उर्वरित रस्त्यांकडे मात्र कंत्राटदारांनी दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना सध्या तरी खड्यातून मार्ग काढावा लागत आहे.
२०१७-१८ या वर्षात पूर्णा तालुक्यातील १६ रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली होती. यामध्ये ताडकळस-पूर्णा-नांदेड (राज्य मार्ग ६१), पिंपळा भत्या, आलेगाव, कावलगाव (प्र.जी.मा.२२), पूर्णा, धनगर टाकळी, पालम (राज्य मार्ग २४९), ताडकळस ते लिमला, पूर्णा ते हयातनगर (प्र.जी.मा.११), धनगरटाकळी-सोन्ना ते कावलगाव- पिंपरण (प्र.जी.मा.१२), लिमला ते वझूर (राज्य मार्ग २३५), देवठाणा-देऊळगाव (राज्य मार्ग ६१) या सहा व इतर ग्रामीण रस्त्यासाठी गतवर्षी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च झाला आहे. वर्षभरात या रस्त्यावर पुन्हा नव्याने खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या द्विवार्षिक देखभाल व दुरुस्तीसाठी या रस्त्याच्या काम करणाºया कंत्रटादारांना निर्देश दिले जातात.
यावर्षी पूर्णा ते नांदेड या रस्त्यावरील कि.मी. क्रमांक ३०८/०० ते ३१८/०० व कि.मी.क्रमांक २९८/५०० ते ३०८/०० या रस्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे;परंतु, या रस्त्या व्यतीरिक्त इतर रस्त्यावरही मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारांना निर्देश दिले की नाही ? ही बाब मात्र अजून अस्पष्ट आहे. त्यामुळे प्रवाशांना व वाहनधारकांना एक वर्षापूर्वी झालेल्या रस्त्यावरील खड्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधित कंत्राटदारांना निर्देश देऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
अनेक कामांना : वाढीव निधी
४पूर्णा तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी व इतर दुरुस्तीसाठी मंजूर निधी व्यतीरिक्त जादा निधी आवश्यक असल्याची मागणी काही कंत्राटदारांकडून करण्यात आली होती. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाढीव निधी मंजूर करण्यात आला असतानाही अनेक कामे द्विवार्षिक देखभाल दुरुस्तींतर्गत अद्यापपर्यंत सुरू झाली नाहीत. त्यामुळे पूर्णा तालुक्यातील प्रवाशांसह वाहनधारकांना खड्यातून प्रवास करावा लागत आहे. तालुक्यातील १६ रस्त्यांपैकी बहुतांश रस्त्यांची कामे एक वर्षापूर्वीच झालेली आहेत.
खड्डे बुजविण्याबाबत कंत्राटदार उदासिन
४रस्ता दुरुस्तीच्या कामात मंजूर बिलापैकी अर्धी रक्कम संबंधित कंत्राटदाराला मिळाली आहे. तर उर्वरित बिल अजूनही अदा करणे बाकी आहे. काम केल्यानंतर आगामी दोन वर्षात देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराकडे असते. एकदा रस्त्याचे काम झाल्यानंतर त्या कंत्राटदारांकडून नंतर दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्षच देत नाही. त्यामुळे कंत्राटदारांनाही सा.बां.च्या या भूमिकेचा फायदाच होतो. त्यामुळे कंत्राटदारांकडून थातूरमातूर रस्त्याचे काम पूर्ण करून सोपस्कार पार पाडला जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी सा.बां. च्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन द्विवार्षिक योजनेमधून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: Khadeck Khade on the road due to lack of maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.