परभणी : अपहृत मुलगी पूर्णेत सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:02 AM2018-03-29T01:02:27+5:302018-03-29T01:02:27+5:30
औरंगाबाद येथील सातारा पोलिसात अपहरणाची तक्रार असलेली मुलगी पूर्णा रेल्वेस्थानकावर २६ मार्च रोजी सापडली. चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरा या मुलीला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): औरंगाबाद येथील सातारा पोलिसात अपहरणाची तक्रार असलेली मुलगी पूर्णा रेल्वेस्थानकावर २६ मार्च रोजी सापडली. चौकशी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरा या मुलीला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीवरून पूर्णा रेल्वेस्थानकावर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास एक २५ वर्षीय महिला व तिच्या सोबत एक अल्पवयीन मुलगी संशयितरीत्या फिरताना आढळून आली. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजयकुमार, जावेद यांनी विचारपूस केली. तेव्हा संशय आल्याने त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात आणले. अधिक चौकशीनंतर त्या दोघी औरंगाबाद येथूून पळून आल्याची बाब उघडकीस आली. औरंगाबाद पोलिसांना संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसात अपहरणाची तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी रात्री उशिरा औरंगाबाद येथून सदर मुलीचे नातेवाईक व औरंगाबाद पोलीस पूर्णा येथे दाखल झाले. रेल्वे सुरक्षा बलाने या दोघींना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन केले.