परभणी : बालकाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 12:40 AM2019-07-30T00:40:39+5:302019-07-30T00:41:20+5:30
शहरातील संत जनाबाईनगरातील एका १३ वर्षीय मुलास पळवून नेल्या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): शहरातील संत जनाबाईनगरातील एका १३ वर्षीय मुलास पळवून नेल्या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.
इयत्ता नववी वर्गात शिकणारा रविंद्र बाजीराव गडदे हा २८ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहरातील संत जनाबाईनगर येथील स्वत:च्या घरातून बेपत्ता झाला आहे. रविंद्र गडदे याच्या पालकांनी गंगाखेड शहरासह लोहा, परळी, परभणी आदी ठिकाणी शोध घेतला. मात्र मुलाचा शोध लागला नाही. त्यामुळे अपहृत मुलाची आई अहिल्याबाई बाजीराव गडदे यांनी गंगाखेड पोलिसांकडे तक्रार नोंदविली. या फिर्यादीवरुन २९ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक घोगरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.