परभणी : जिंतूर येथे जखमी करकोचाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:11 AM2018-10-19T00:11:05+5:302018-10-19T00:12:28+5:30
झाड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या करकोचा या पक्ष्यावर पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी वेळीच उपचार केल्याने या पक्ष्याचे प्राण वाचले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): झाड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या करकोचा या पक्ष्यावर पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी वेळीच उपचार केल्याने या पक्ष्याचे प्राण वाचले आहेत़
१८ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास भोगाव देवी येथील वैभव जोशी यांनी पक्षीमित्र अनिल उरटवाड यांना फोन करून करकोचा पक्षी जखमी झाल्याची माहिती दिली़ भोगाव देवी परिसरातील पिंपळाचे झाड पडल्याने या झाडावर घरटे असलेला करकोचा हा पक्षी जखमी झाला होता़ तर एक पक्षी मृत झाला होता़ अनिल उरटवाड यांनी या पक्ष्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार केले़ त्यामुळे पक्ष्याचे प्राण वाचले असून त्यास मैनापुरी परिसरात सोडून देण्यात आले़