परभणी : पाण्याचा बेसुमार उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:15 AM2019-01-07T01:15:21+5:302019-01-07T01:15:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गंगाखेड ( परभणी ) : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात पिण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या पाण्याचा मोटारीच्या सहाय्याने रात्रंदिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी ) : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात पिण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या पाण्याचा मोटारीच्या सहाय्याने रात्रंदिवस बेसुमार उपसा होत असल्याने गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गोदावरी नदीपात्रातून होणारा पाण्याचा उपसा बंद न केल्यास गोदाकाठच्या ग्रामीण भागासह गंगाखेड शहराला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील मुळी येथे बांधण्यात आलेल्या बंधाºयाचे दरवाजे निखळून पडलेले असल्याने गेल्या काही वर्षापासून बंधाºयात पावसाच्या पाण्याची साठवण होत नाही. बंधाºयाला असलेल्या सिमेंट ओट्यामुळे मुळी, दुस्सलगाव ते खळी, महातपुरी, आनंदवाडी शिवारात नदीपात्रात काही प्रमाणात पाणी साचलेले राहत आहे. नदीपात्रातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने येथे असलेल्या कृषीपंपाच्या मोटारी काढून घेण्याच्या सूचना संबंंधित शेतकºयांना दिल्या; परंतु, याकडे दुर्लक्ष करीत खळी गावच्या वरच्या भागात असलेल्या आसरामाय डोहातून ब्रह्मनाथवाडी, धारासूर शिवारापर्यंत अंदाजे तीन ते चार कि.मी. पर्यंत पाईपलाईन करून कृषीपंपाच्या सहाय्याने नदीपात्रातील पाणी शेतात नेले जात आहे. खळी गावातील मारोती मंदिराजवळील खळी डोहातून महातपुरी शिवारातील शेतात कृषीपंपाने व खळी पुलाजवळ असलेल्या कनकेश्वरी मठाजवळील सीतामाय डोहातून महातपुरी, आनंदवाडी, दत्तवाडी तसेच भांबरवाडी शिवारातील पाच ते सात कि.मी. अंतरापर्यंत पाईपलाईन टाकून विद्युत मोटारीच्या सहाय्याने नदीपात्रातून शेतापर्यंत पोहचविण्यासाठी रात्रंदिवस बेसुमार उपसा केला जात आहे.
गोदावदी नदीपात्रातील मुळी बंधाºयाच्या सिमेंट ओट्यामुळे बंधारा भागात मुळी, दुस्सलगाव, खळी, महातपुरी, आनंदवाडी आदी शिवारात साचलेल्या पाण्याचा कृषीपंपाच्या सहाय्याने शेतीच्या वापरासाठी रात्रंदिवस उपसा होत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने खालावून नदीचे पात्र कोरडे पडत आहे. पिण्यासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा उपसा वेळीच थांबविला नाही तर भविष्यात गोदाकाठी असलेल्या ग्रामीण भागातील गावांबरोबरच गंगाखेड शहरवासिय तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण होईल, अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पिण्यासाठी आरक्षित असलेल्या गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा उपसा तत्काळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
४गंजायकवाडी विभागाने शेतकºयांना दिली नोटीस
भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी गंगाखेड तालुक्यातील खडका बंधारा, मुळी बंधारा व गोदावरी नदीपात्रातील पाणीसाठा सभोवतालच्या गावाकरीता हा पिण्यासाठी राखीव ठेवला आहे. त्यामुळे या ठिकाणावरुन पाणी उपसा करता येणार नाही. तेव्हा ३० जून २०१९ पर्यंत आपण खडका, मुळी बंधारा व गोदावरी नदीपात्रातून विद्युत मोटारीने पाणी उपसा बंद करावा, अन्यथा विद्युत मोटारी व इतर साहित्य जप्त करण्याची कार्यवाही करण्यात येतील, अशा नोटिसा जायकवाडी पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक ८ चे शाखाधिकारी यांनी १५ डिसेंबर २०१८ रोजीच संबंधित शेतकºयांना बजावल्या आहेत. गाखेड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवत असताना गोदावरी नदीपात्रातून बसुमार पाण्याचा उपसा सुरू आहे; परंतु, याकडे तालुका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
४त्यामुळे बिनदिक्कतपणे शेतीसाठी पाण्याचा उपसा सुरू आहे. जायकवाडी विभागाने नोटिसा देऊनही पाणी उपसा थांबत नसेल तर भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.