परभणी : जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:47 AM2018-12-02T00:47:17+5:302018-12-02T00:47:53+5:30

शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़

Parbhani: LaGena Muhurat to buy soya bean in the district | परभणी : जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीला लागेना मुहूर्त

परभणी : जिल्ह्यात सोयाबीनच्या खरेदीला लागेना मुहूर्त

googlenewsNext

मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतमालाची हमीभावात खरेदी व्हावी, यासाठी राज्य शासन व नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सहा ठिकाणी २० नोव्हेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ मात्र दहा दिवस उलटले तरी एकाही केंद्रावरह सोयाबीनची खरेदी झाली नाही़ विशेष म्हणजे, परभणी व सेलूत अद्यापही केंद्र सुरू करण्यास जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाला मुहूर्तच सापडत नसल्याचे समोर आले आहे़
यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाला फाटा देत सोयाबीन, उडीद व मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली़ कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकºयांना म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही़ मात्र उत्पादित शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर शेतकºयांची अडवणूक होत असल्याने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पालम, पाथरी व पूर्णा या सहा ठिकाणी नाफेड व राज्य शासनाच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास परवागनी मिळाली़ २० नोव्हेंबरपासून या सहा केंद्रांपैकी चार ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़
१० दिवस उलटले असतानाही किलोभरही सोयाबीनची खरेदी हमीभाव खरेदी केंद्रांकडून करण्यात आली नाही़ त्यामुळे शेतकºयांना आपला शेतीमाल पडेल भावात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात खाजगी व्यापाºयांना विक्री करावा लागत आहे़ परंतु, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा जिल्हा मार्केटींग अधिकाºयांना याचे देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे़
दुष्काळी परिस्थिती सापडलेल्या शेतकºयांसाठी लोकप्रतिनिधींनी तरी पुढे येथून हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकºयांचा शेतमाल घेण्यासाठी भाग पाडावे, अशी मागणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांमधून करण्यात येत आहे़
११ हजार ९० शेतकºयांनी केली नोंदणी
जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतमाल विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ११ हजार ९० शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयाकडे नोंदणी केली आहे़ २ हजार ९६४ मूग उत्पादकांनी, ३५२ उडीद तर ७ हजार ७९२ सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केला आहे; परंतु, हमीभाव खरेदी केंद्रांवर संथगतीच्या कारभाराने शेतकºयांचा शेतमाल नोंदणी करूनही घरातच पडून राहतो की काय अशी शंका शेतकºयांच्या उपस्थित होत आहे़
४दरम्यान, परभणी व सेलू येथील हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ कार्यान्वित करून जिल्ह्यातील शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी सोयाबीन, मूग, उडीद उत्पादकांतून होत आहे़
़़़ तर शेत मालाला मिळेल भाव
जिल्ह्यातील सहाही ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले तर खाजगी बाजारपेठेमध्ये शेतकºयांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल़ परंतु, जिल्ह्यातील सहापैकी चार ठिकाणचे हमीभाव खरेदी केंद्र २० नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहेत़ परंतु, सोयाबीनची खरेदी अद्यापही झालेली नाही़ त्यातच परभणी व सेलू केंद्राला खरेदीसाठी मुहूर्तच मिळाला नाही़ याचा फायदा खाजगी व्यापारी उठवित आहेत़
सोयाबीन परभणी येथील केंद्रावर १ हजार ९३८ शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे़ त्याचबरोबर जिंतूर २ हजार ३७९, सेलू १ हजार ६५७, पालम १३००, पाथरी २९७ तर पूर्णा तालुक्यात २६१ अशा एकूण ७ हजार ७९२ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ परंतु, एकाही शेतकºयाचा माल खरेदी केला नाही़
मूग विक्रीसाठी जिल्ह्यातील २ हजार ९४६ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़; परंतु, आतापर्यंत केवळ ३७९ क्विंटल ५३ किलोचीच खरेदी करण्यात आली आहे़ परभणी येथील केंद्रांवर ६१५, जिंतूर २२०, सेलू १३४२, पालम २३०, पाथरी ३८४ तर पूर्णा तालुक्यात १५३ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ या ठिकाणीही संथगतीचा फटका बसत आहे़
उडीद विक्रीसाठी ३५२ शेतकºयांनी नोंदणी करून केवळ ९७ क्विंटल ४६ किलोचीच खरेदी झाली आहे़ परभणी केंद्रावर ३२, जिंतूर २२७, सेलू ६०, पालम १०, पाथरी ११ तर पूर्णा तालुक्यातील १२ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ मात्र खरेदी संथगतीने होत आहे़

Web Title: Parbhani: LaGena Muhurat to buy soya bean in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.