परभणी: पाथरी तालुक्यात हळदीच्या उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:33 AM2019-04-27T00:33:40+5:302019-04-27T00:33:48+5:30
सातत्याने बोंडअळीचा प्रादूर्भाव सहन करणाºया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पर्याय म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने हळद पिकाला तालुक्यात उतारा कमी येऊ लागला आहे. त्यातच खर्च जास्त आणि उत्पन्नात घट, अशी अवस्था झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): सातत्याने बोंडअळीचा प्रादूर्भाव सहन करणाºया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पर्याय म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने हळद पिकाला तालुक्यात उतारा कमी येऊ लागला आहे. त्यातच खर्च जास्त आणि उत्पन्नात घट, अशी अवस्था झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कापसाचे भांडार समजल्या जाणाºया पाथरी तालुक्यात मागील वर्षापासून कापसावर गुलाबी बोंडअळीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस उत्पादनात मोठी घट होऊन लागवडीचा खर्च ही निघणे अवघड झाले. त्याच बरोबर सोयाबीनला ही पाहिजे तसा उतारा येत नसल्याने आता तालुक्यातील अनेक शेतकरी निरोगी उत्पादनाची हमी असणाºयांना हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत.
यावर्षी ही मोठ्या प्रमाणात हळद लागवड करण्यात आली आहे; परंतु, पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने हळदीच्या उत्पादनात मोठी घट दिसून येऊ लागली आहे.
तालुक्यात सध्या हळद काढणी सुरू आहे. मात्र उतारा घटल्याने हळद लागवड करणारे पाथरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
दुष्काळामुळे ५० टक्के उत्पादन घटले
एका एकरमध्ये पिकातून जवळपास ८० ते ९० क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित असते. १०० क्विंटल ओल्या हळदीमधून २० ते २५ क्विंटल पक्की हळद तयार होते; परंतु, यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे हळदीच्या उताºयात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
सध्या हळद काढणी सुरू असून एका एकरमध्ये केवळ ५० ते ५५ क्विंंटल हळद उत्पादनाचा उतारा येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या दुष्काळामुळे उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आहे.