परभणी : २३ वर्षांपासून रायपूरकरांना मिळेना पक्का रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:48 PM2018-12-26T23:48:23+5:302018-12-26T23:48:35+5:30
रायपूर ते चिकलठाणा खु. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील तीन गावातील वाहतूक धोकादायक बनली आहे. २३ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन गावातील ग्रामस्थांमधून सा.बां. विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : रायपूर ते चिकलठाणा खु. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या मार्गावरील तीन गावातील वाहतूक धोकादायक बनली आहे. २३ वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तीन गावातील ग्रामस्थांमधून सा.बां. विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रायपूर ते चिकलठाणा हा ३ कि.मी. रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहने या रस्त्यावर चालविणे अवघड झाले आहे. या रस्त्यावरील गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सेलू येथे यावे लागते; परंतु, रस्ता खराब असल्याने वेळेवर शाळेत जाण्यासाठी वाहने उपलब्ध होत नाहीत. तसेच शेतीमाल तालुक्याच्या ठिकाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण निर्माण होत आहे. अनेकदा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत. रुग्णालयात येणाºयांचेही हाल होत आहेत. पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलाने माखतो. परिणामी, वाहतूक बंद होते. सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.