परभणी : कृषी उत्पादकतेला ८४ गावांत चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:24 AM2018-10-21T00:24:01+5:302018-10-21T00:24:33+5:30
कृषी उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जिल्ह्यातील २७५ गावांमध्ये राबविण्यात येणार असून पहिल्या टप्यात या योजनेंतर्गत ८४ गावांची निवड करण्यात आली आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कृषी उत्पादकता वाढविण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना जिल्ह्यातील २७५ गावांमध्ये राबविण्यात येणार असून पहिल्या टप्यात या योजनेंतर्गत ८४ गावांची निवड करण्यात आली आहे .
राज्यातील कृषी क्षेत्रासमोर निर्माण झालेली आव्हाने पाहता कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना राज्यातील १५ आवर्षणग्रस्त जिल्हे व खारपट्टा भागात सुरू करण्याचा निर्णय गतवर्षी घेण्यात आला होता. त्यात परभणी जिल्ह्याचा समावेश होता. जिल्ह्यातील २७५ गावांची ही योजना राबविण्यासाठी निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्यात यातील ९ तालुक्यातील ८४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १२ गावांचा समावेश असून या गावांमध्ये ११ ग्रा.पं.त कृषी संजीवनी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिंतूर तालुक्यातील १३ गावांची निवड करण्यात आली असून १० समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मानवत तालुक्यातील ६ गावांची निवड करण्यात आली असून सर्वच ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सेलू तालुक्यातील ७ गावांची निवड करण्यात आली असून सर्वच ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
पाथरी तालुक्यातील १० गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी ९ ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सोनपेठ तालुक्यातील ९ गावांची निवड करण्यात आली असून ८ ठिकाणी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
परभणी तालुक्यातील ५ गावांची निवड करण्यात आली असून या सर्व गावांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. पूर्णा तालुक्यातील ११ गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी ८ गावांमध्ये समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. पालम तालुक्यात ११ गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून त्यापैकी १० गावांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ८४ गावांमध्ये ८४० हेक्टरवर फळबाग लागवडीचा लक्षांक ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये गंगाखेड व जिंतूर तालुक्यात प्रत्येकी १२० हेक्टर जमिनीवर तर मानवत तालुक्यात ६०, सेलू तालुक्यात ७०, पाथरी तालुक्यात १००, सोनपेठ तालुक्यात ९०, परभणी तालुक्यात ५०, पूर्णा, पालम तालुक्यात प्रत्येकी ११० हेक्टरचा लक्षांक आहे.
अशी आहेत: प्रकल्पाची वैशिष्टे
४नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे, अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे, शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे ही या प्रकल्पाची वैशिष्टये आहेत.
४क्रीडा व टेरी यांनी विकसित केलेल्या शास्त्रीय निर्देशांकांचा वापर करून प्रकल्पांतर्गत समूह पद्धतीने गावांची निवड करण्यात आली आहे. महसूल मंडळ निहाय उभारणी करण्यात येणाºया स्वयंचलित हवामान केंद्रांकडून प्राप्त होणाºया माहितीस अनुसरून शेतकºयांना कृषी हवामान सल्ला देण्यात येणार आहे. शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करण्यात येणार आहे.