परभणी :अवघ्या २० फुटांवरून पाहिला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:06 AM2018-03-08T00:06:47+5:302018-03-08T00:08:41+5:30
तालुक्यातील देवठाणा आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या शक्यतेचा इनकार करणाºया वन विभागातील अधिकाºयांच्या समोरच अवघ्या २० फुटावर बिबट्या येऊन उभा टाकल्याने आता बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाले असून, वन विभागाचे पथक बिबट्या पकडण्यासाठी सापळा रचून प्रयत्न करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : तालुक्यातील देवठाणा आणि परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या शक्यतेचा इनकार करणाºया वन विभागातील अधिकाºयांच्या समोरच अवघ्या २० फुटावर बिबट्या येऊन उभा टाकल्याने आता बिबट्याचे अस्तित्व सिद्ध झाले असून, वन विभागाचे पथक बिबट्या पकडण्यासाठी सापळा रचून प्रयत्न करीत आहे.
तालुक्यातील देऊळगाव दुधाटे परिसरात अज्ञात हिंस्त्र पशूने शेळीच्या पिलांवर हल्ला केल्याची घटना २ मार्च रोजी घडली होती़ ही माहिती वन अधिकाºयांना देण्यात आली़ ग्रामस्थांनी सुुरुवातीपासून अधिकाºयांकडे बिबट्या असल्याची शक्यता वर्तविली होती़ परंतु, हल्ला करणारा प्राणी बिबट्या नसून तरस असावा, अशी शक्यता अधिकाºयांनी वर्तविली होती़ या प्रकारानंतर देऊळगाव गावाजवळ असलेल्या देवठाणा परिसरात गायीच्या वासरावर हल्ला करण्याची घटना झाली़ त्यानंतर वन विभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ ६ मार्च रोजी रात्री या अज्ञात पशूचा शोध सुरू असताना वन अधिकाºयांच्या समोरच अवघ्या २० फुटावर बिबट्या उभा असल्याचे दिसले़ त्यामुळे हल्ला करणारा बिबट्याच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे़ देवठाणा परिसरात गायीच्या वासरावर हल्ला झाल्यानंतर या पशूच्या पावलांचे ठसे पाहून वन विभागाने बिबट्या असल्याची शक्यता वर्तविली होती़ त्यानंतर तातडीने पावले उचलत ६ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास वन परिक्षेत्र अधिकारी डीक़े़डाखोरे, व्ही़एऩ सातपुते, भंडारी व इतर अधिकाºयांचा ताफा गावात दाखल झाला़ ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याचा शोध सुरू केला़
दरम्यान, ७ मार्च रोजी सायंकाळपर्यंत बिबट्या हाती लागला नसल्याने देवठाणा, देऊळगाव, लिमला परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ वन विभागाच्या अधिकाºयांनी या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे़
बिबट्या पकडण्यासाठी सापळाही रचला़ हल्ला केलेल्या गायीच्या वासराचा मृतदेह व पिंजºयात शेळीचे पिल्लू ठेवण्यात आले़ बिबट्याची शोध मोहीम सुरू असतानाच ६ मार्च रोजी रात्री वन विभागाच्या अधिकाºयांची नजर बिबट्यावर गेली़ अधिकाºयांपासून अवघ्या २० फुट अंतरावर हा बिबट्या होता़ दरम्यान, अधिकारी व गावकºयांना पाहून बिबट्याने तेथून पळ काढला़ बिबट्याला पकडण्यासाठी आता वन विभागाने कसोशीचे प्रयत्न सुरू केले आहेत़ बिबट्या सापळ्यात नक्की अडकेल, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे़