परभणी : पालममध्ये सख्ख्या बहिणी तलावात बुडाल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:08 AM2018-01-23T00:08:28+5:302018-01-23T00:09:43+5:30
कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली़ त्यापैकी एकीला वाचविण्यात यश आले असून, तिच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत़ तर दुसरीचा तलावातील पाण्यात शोध घेतला जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम : कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या सख्ख्या बहिणी पाण्यात बुडाल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली़ त्यापैकी एकीला वाचविण्यात यश आले असून, तिच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत़ तर दुसरीचा तलावातील पाण्यात शोध घेतला जात आहे़
शहरातील ताडकळस रस्त्यालगत पठाण गल्लीजवळ निजामकालीन तलाव आहे़ २१ जानेवारी रोजी सकाळी दोघी बहिणी या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या़ त्यापैकी छोट्या बहिणीचा तोल गेल्याने ती पाण्यात पडली़ तिला वाचविण्यासाठी जवळच उभ्या असलेल्या बहिणीनेही पाण्यामध्ये उडी घेतली़ पाण्यात बुडत असलेल्या छोट्या बहिणीला वाचविण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी जवळूनच जाणाºया काही जणांनी तिला पाण्याबाहेर काढले़ अत्यस्वस्थ असलेल्या दहा वर्षीय मुलीला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले असून, या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत़ तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती मिळाली़ दरम्यान, दुसरी बहिण मात्र पाण्यातच बुडाली असून, तिचा शोध लागलेला नाही़ २१ व २२ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत स्थानिकांच्या मदतीने तलावामध्ये मुलीचा शोध घेण्यात आला़ मात्र ही मुलगी सापडली नाही़ पाण्यात पडलेली मुलींची नावे मात्र उशिरापर्यंत समजू शकली नाहीत़ याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली नव्हती़