परभणी लोकसभा निवडणूक निकाल 2019: बालेकिल्ल्यात शिवसेनेचे जाधव सुरक्षित; विटेकर यांची पीछेहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:53 PM2019-05-23T12:53:05+5:302019-05-23T12:54:27+5:30
Parbhani Lok Sabha Election Results 2019 :पहिल्या फेरीनंतर शिवसेनेच्या जाधव यांची आघाडी
परभणी : शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी शिवसेनेचे खा़ संजय जाधव व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांच्या मुख्य लढत होत आहे़ १९९१ पासून २०१४ पर्यंत झालेल्या सात लोकसभेच्या निवडणुकीत १९९८ चा अपवाद वगळता सहा वेळा शिवसेनेने विजय मिळविला आहे़ त्यामध्ये चार वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा सेनेने पराभव केला आहे़ त्यामुळे शिवसेना या यशाची पुनरावृत्ती करते की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देऊन इतिहास घडविते याविषयी मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे़
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सातव्या फेरी अखेर जाधव यांना २७ हजार ४१७ मतांची आघाडी
मतदारसंघः परभणी
फेरीः सातवी पूर्ण
आघाडीवरील उमेदवाराचे नावः संजय जाधव
पक्षः शिवसेना
मतंः 152380
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः राजेश विटेकर
पक्षः राष्ट्रवादी
मतंः 124963
पिछाडीवरील उमेदवाराचे नावः आलमगीर खान
पक्षः वंचित बहुजन आघाडी
मतंः 38691
परभणी लोकसभा मतदार संघात एकूण १९ लाख ८३ हजार ९०२ मतदार असून, १२ लाख ५१ हजार ८२५ (६३़१०) टक्के मतदान झालं आहे़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना ५ लाख ७८ हजार ४५५ मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना ४ लाख ५१ हजार ३०० मते मिळाली होती़ जाधव यांनी भांबळे यांचा १ लाख २७ हजार १५५ मतांनी पराभव केला होता़