परभणी : सोयाबीनच्या गंजीला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:30 AM2018-10-30T00:30:41+5:302018-10-30T00:31:13+5:30

तालुक्यातील हतनूर येथील शेतकºयांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.

Parbhani: The loss of the farmer due to the burning of soya bean | परभणी : सोयाबीनच्या गंजीला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान

परभणी : सोयाबीनच्या गंजीला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : तालुक्यातील हतनूर येथील शेतकºयांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २८ आॅक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली.
सेलू तालुक्यातील हतनूर येथे एकनाथ ग्यानोबा कºहाळे यांची गट क्रमांक ६६ मध्ये १ हेक्टर ४० आर शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये कºहाळे यांनी खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी केली. या पिकाची कापणी करून शेतामध्ये गंजी लावली;परंतु, २८ आॅक्टोबर रोजी रात्री ११ च्या सुमारास या गंजीला अचानक आग लागून संपूर्ण सोयाबीन पीक जळून खाक झाले आहे. तसेच गंजीवर झाकलेली ताडपत्री, शेती उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
पावसाअभावी पिके करपून गेली असताना थोड्याफार प्रमाणात हातात आलेले सोयाबीन जळाल्याने संताप व्यक्त होत आहे. या गंजीला आग लावली की, लागली? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कºहाळे यांच्या तक्रारीवरून सेलू पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकºयांवर कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे.
नुकसान भरपाई देण्याची शेतकºयाची मागणी
४मागील काही दिवासांपासून सेलू तालुक्यात शेतकºयांनी शेतात उभ्या केलेल्या सोयाबीनच्या गंजी जळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अधिच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकºयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
४सेलू तालुक्यातील हतनूर येथील रविवारी घडलेल्या घटनेत जवळपास साडेतीन एकरवरील सोयाबीनचे पीक जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हाती आलेले पीक अज्ञात व्यक्तींनी आगीच्या भक्षस्थानी टाकले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयाला तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: The loss of the farmer due to the burning of soya bean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.