परभणी : महावंदनेस उसळला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 11:48 PM2019-10-08T23:48:13+5:302019-10-08T23:48:35+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ८ आॅक्टोबर रोजी महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. या महावंदना कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपासकांची उपस्थिती होती. सलग सहाव्या वर्षी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात ८ आॅक्टोबर रोजी महावंदनेचा कार्यक्रम पार पडला. या महावंदना कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून उपासकांची उपस्थिती होती. सलग सहाव्या वर्षी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुप्रवर्तन दिनानिमित्त ८ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले. शहरातील ठिकठिकाणच्या समाजमंदिरामध्ये या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महावंदना सुकाणू समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात महावंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता या मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रमास पूर्णा येथील उपगुप्त महाथेरो यांच्यासह भिख्खू गणाची प्रमुख उपस्थिती होती. उपगुप्त महाथेरो यांनी धम्मदेसना दिली. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महावंदना घेण्यात आली. महावंदनेच्या कार्यक्रमानंतर उपासकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दुपारपर्यंत उपासकांच्या रांगा लागल्या होत्या. महावंदना सुकाणू समितीच्या वतीने मागील सहा वर्षापासून महावंदनेचा हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हजारोंच्या संख्येने उपासक, उपासिका शुभ्रवस्त्र परिधान करुन कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याच प्रमाणे विविध प्रकारच्या मूर्ती, धार्मिक साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होते.
कार्यक्रमस्थळ परिसरात पुस्तकांची मोठ्या संख्येने विक्री
४परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मंगळवारी महावंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमस्थळ परिसरात जवळपास ५ ते ६ पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते.
४या स्टॉलवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, २२ प्रतिज्ञा, भारतीय राज्यघटना आदी पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, संत कबीर आदींची पुस्तकेही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती.
४सकाळच्यावेळी महावंदनेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर येथील पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी झाली होती. त्यामध्ये अनेकांनी पुस्तके खरेदी केली.
४ त्यामुळे पुस्तक विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय या परिसरात तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्याचीही खरेदी यावेळी करण्यात आली.