परभणी : ट्रायको कार्डनेच बोंडअळीचे व्यवस्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:23 PM2019-06-19T23:23:22+5:302019-06-19T23:24:17+5:30
शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनात जैविक पद्धतीबाबत जागरुकता होत आहे; परंतु, जैविक निविष्ठांची योग्य वेळी उपलब्धता होत नाही़ कापूस पिकामध्ये ट्रायको कार्डचा वापर केल्यास बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतकऱ्यांमध्ये कीड व्यवस्थापनात जैविक पद्धतीबाबत जागरुकता होत आहे; परंतु, जैविक निविष्ठांची योग्य वेळी उपलब्धता होत नाही़ कापूस पिकामध्ये ट्रायको कार्डचा वापर केल्यास बोंडअळीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले यांनी केले़
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी कीटकशास्त्र विभागातील परोपजीवी कीटक संशोधन योजना व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत जैविक घटक, त्याची निर्मिती व कीड व्यवस्थापनातील उपयुक्ता या विषयावर १२ जून रोजी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला़ या प्रसंगी इंगोले बोलत होते़ कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, विभागप्रमुख डॉ़ पुरुषोत्तम झंवर, जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेचे प्रभारी अधिकारी बबन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ दत्तप्रसाद वासकर म्हणाले, परोपजीवी कीटक संशोधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ट्रायको कार्डची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न केला जाईल़ याद्वारे कमी खर्चात अधिक प्रभावीपणे गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन होऊ शकेल़ डॉ़ पी़ आऱ झंवर यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी डॉ़ एम़एम़ सोनकांबळे, डॉ़ बी़व्ही़ भेदे, डॉ़ एस़एस़ धरगुडे, डॉ़ ए़जी़ बडगुजर आदींनी तांत्रिक सादरीकरण करून ट्रायको कार्ड निर्मितीची माहिती दिली़ वनस्पती विकृतीशास्त्र विभागात बायोमिक्स, ट्रायकोडर्मा व जैविक बुरशी निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले़
४या प्रशिक्षणात शासकीय जैविक कीड नियंत्रण प्रयोग शाळेतील अधिकारी, कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्र, क्रॉपसॅप प्रकल्पातील जिल्हा समन्वयक, शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते़
४येत्या हंगामात औरंगाबाद, परभणी व नांदेड येथील जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा व विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागात ट्रायको कार्डची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली़