परभणी : मॅरेथॉनपटू मात्रेने केला संकल्प; २०२४ पर्यंत आॅलिम्पिक गाठण्याचे बाळगले ध्येय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:57 AM2020-01-05T00:57:15+5:302020-01-05T00:59:05+5:30
देशांतर्गत होणाऱ्या दोन राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालत परभणी जिल्ह्याचे नाव गाजविणाºया येथील मॅरेथॉनपटू किरण पांडुरंग मात्रे याने यापुढील स्पर्धांची तयारीही सुरु केली आहे. आतापर्यंत केलेला सराव आणि यापुढील ध्येयाविषयी त्याच्याशी साधलेला संवाद.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देशांतर्गत होणाऱ्या दोन राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घालत परभणी जिल्ह्याचे नाव गाजविणाºया येथील मॅरेथॉनपटू किरण पांडुरंग मात्रे याने यापुढील स्पर्धांची तयारीही सुरु केली आहे. आतापर्यंत केलेला सराव आणि यापुढील ध्येयाविषयी त्याच्याशी साधलेला संवाद...
अॅथेलॅटिक्सकडे तू कसा वळालास?
परभणी तालुक्यातील उखळदवाडी येथील मी रहिवासी असून शालेय शिक्षण घेत असताना गावात काही विद्यार्थी दररोज धावण्याचा सराव करीत होते. त्यांच्या सोबत मीही धावू लागलो. नियमित सरावामुळे मी या प्रकारात नैपुण्य प्राप्त केले. मग शालेय स्पर्धांमधून सहभाग नोंदवित मॅरेथॉनमध्ये अनेक बक्षिसेही मिळविली. आता प्रशिक्षक रवि रासकटला यांच्याकडे धावण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे.
आतापर्यंत कोणत्या स्पर्धा गाजविल्या?
जानेवारी २०१९ मध्ये गुजरात राज्यातील नाडियाल येथे शालेय राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत ६ कि.मी.चे अंतर १७.५६ मिनिटात पार करुन सुवर्णपदक मिळविले. तर डिसेंबर २०१९ मध्ये पंजाब राज्यातील संगरुर येथे पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत १७.०६ मिनिटात ६ कि.मी. अंतर पार करुन सुवर्णपदक मिळविले आहे. याशिवाय राज्यस्तरीय स्पर्धेत २ सुवर्ण, ३ कास्य.
यापुढे कोणते ध्येय आहे?
आॅलिम्पिक स्पर्धेत भाग घेऊ देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे ध्येय आहे. त्या दृष्टीने सराव करीत आहे.
मॅरेथॉन स्पर्धेचा सराव कसा करतोस?
आठवी इयत्तेपासून धावण्याचा सराव करीत आहे. आता प्रशिक्षक रवि रासकटला सरांकडे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार दररोज सराव करतो. लांब अंतराच्या धावण्याचा सराव शक्यतो सकाळच्या वेळी केला जातो आणि कमी वेळेत जास्त अंतर गाठण्याचा सराव सायंकाळच्या वेळी करीत आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर दररोज १५ ते २० कि.मी. अंतर सराव करीत आहे. गोकुळनाथ विद्यालयाचेही सहकार्य मिळत आहे.