आकर्षक रंगांनी सजली परभणीची बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:45 AM2018-03-01T00:45:05+5:302018-03-01T00:45:13+5:30
आकर्षक रंग आणि त्या जोडीला विविध आकाराच्या पिचकाºयांनी बाजारपेठ सध्या सजली आहे़ धुलीवंदनापूर्वीची रंगांची उधळणच या बाजारपेठेत होत असल्याचे दिसत आहे़ होळी आणि धुलीवंदनाचा सण समीप आल्याने बाजारपेठेतही रंगांच्या खरेदीसाठी युवकांनी गर्दी केली होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आकर्षक रंग आणि त्या जोडीला विविध आकाराच्या पिचकाºयांनी बाजारपेठ सध्या सजली आहे़ धुलीवंदनापूर्वीची रंगांची उधळणच या बाजारपेठेत होत असल्याचे दिसत आहे़ होळी आणि धुलीवंदनाचा सण समीप आल्याने बाजारपेठेतही रंगांच्या खरेदीसाठी युवकांनी गर्दी केली होती़
गुरुवारी जिल्हाभरात होळीचा सण साजरा केला जातो आणि त्यानंतर दुसºयाच दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते़ दरवर्षी या दोन्ही सणांना युवकांचा उत्साह वाढलेला असतो़ यावर्षी देखील होळी, धुलीवंदनासाठी युवक आणि बच्चे कंपनी सज्ज झाली आहे़
या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेतही विविध स्टॉल्स लागले आहेत़ लाल, निळा, हिरवा, पिवळा असे वेगवेगळे रंग विक्रीसाठी दाखल झाले आहेत़ रंगांची आरास मांडून लावलेले स्टॉल्स बाजारपेठेत येणाºया-जाणाºयांना आकर्षित करीत आहेत़ तर रंगांची उधळण करण्यासाठी लागणाºया पिचकाºयाही व्यापाºयांनी उपलब्ध केल्या आहेत़
लहान मुलांना पिचकाºयांविषयी आकर्षण असते़ ही बाब लक्षात घेऊ यावर्षी कार्टूनचा आकार असणाºया पिचकाºया बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत़ ३० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत या पिचकाºयांची किंमत आहे़ मागील वर्षीच्या तुलनेत पिचकाºयांच्या किंमती स्थिर असल्याचे व्यापाºयांनी सांगितले़ एकंदर होळी आणि धुलीवंदनासाठी शहरातील बाजारपेठ सजली आहे़ बुधवारी सायंकाळपासून रंग खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़