परभणी बाजार समिती :१४ लाखांची उलाढाल ठप्प !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:39 AM2018-09-26T00:39:18+5:302018-09-26T00:40:09+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे १८ सप्टेंबरपासून ते आजपर्यंत जवळपास १४ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनात अजूनही तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील शेतमाल खरेदी बंद पडली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे १८ सप्टेंबरपासून ते आजपर्यंत जवळपास १४ लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनात अजूनही तोडगा न निघाल्याने बाजार समितीतील शेतमाल खरेदी बंद पडली आहे़
परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नोंदणीकृत व्यापाºयांकडून हमीभावानुसार शेतमालाची खरेदी होत नसल्याची तक्रार शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीस भेट दिली़ त्यावैळी काही व्यापाºयांनी नियमानुसार शेतमालाची खरेदी केली नसल्याचे आढळले़ जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेनुसार बाजार समितीच्या सचिवांनी चार व्यापाºयांना आपला परवाना निलंबित का करू नये? अशी नोटीस बजावली होती़
या प्रकारानंतर संबंधित व्यापाºयांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, या मागणीसाठी बाजार समितीतील व्यापारी संघटनेने १८ सप्टेंबरपासून प्रतिष्ठाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे़ या आंदोलनामुळे सात दिवसांपासून बाजार समितीतील शेतमालाची उलाढाल ठप्प झाली आहे़ व्यापाºयांच्या आंदोलनासंदर्भात प्रशासकीय स्तरावरून अद्यापही तोडगा निघाला नाही़ त्यामुळे व्यापाºयांचे आंदोलन सुरूच आहे़ परिणामी बाजार समितीतील आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे़
सरासरी ५० क्विंटल मूगाची आवक थांबली
परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मूग विक्रीसाठी येत आहे़ व्यापाºयांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी दररोज सरासरी ५० ते ६० क्विंटल मुगाची आवक होत होती़ सरासरी ३ हजार ७०० ते ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मुगाला मिळत होता; परंतु, व्यापाºयांच्या आंदोलनामुळे सात दिवसांपासून मुगाची आवकच ठप्प पडली आहे़ दररोज साधारणत: २ लाख रुपयांची उलाढाल सध्या ठप्प असून, मागील सात दिवसांमध्ये १४ लाखांच्या उलाढालीला ब्रेक मिळाला आहे़