परभणी : चाऱ्याअभावी पशूधन विक्रीसाठी बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:41 AM2018-11-19T00:41:48+5:302018-11-19T00:42:08+5:30
तालुक्यात पाणी आणि चाºयाची टंचाई निर्माण झाली असून चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. येथील बाजारपेठेत जनावरांची संख्या वाढली असली तरी खरेदीदार नसल्याने भाव कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यात पाणी आणि चाºयाची टंचाई निर्माण झाली असून चारा उपलब्ध होत नसल्याने पशूपालक जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवत आहेत. येथील बाजारपेठेत जनावरांची संख्या वाढली असली तरी खरेदीदार नसल्याने भाव कोसळल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्यातील तलाव, धरणे कोरडेठाक आहेत. खरीप हंगामातील पिके हातची गेली असून रब्बी हंगामात पेरणी झाली नसल्याने दुष्काळाचे संकट अधिकच गंभीर झाले आहे. पशूधन जगविण्यासाठी शेतकरी दूरदूर अंतरावर चाºयाचा शोध घेत आहेत. टाकाऊ असलेल्या सोयाबीनच्या गुळीचा चारा म्हणून वापर केला जात आहे. तालुक्याबाहेरुन वैरण विकत आणावी लागत आहे. चाºयाअभावी जनावरे जगविणे अवघड झाल्याने बाजारात जनावरांची संख्या वाढली आहे. १७ नोव्हेंबर रोजी गंगाखेडमध्ये जनावरांचा बाजार फुलला होता. परंतु, खरेदीदार मात्र फिरकले नाहीत. त्यामुळे भाव गडगडले होते.
सोयाबीन गुळीचे भाव कडाडले
४कडब्याचे भाव ३० ते ३५ रुपये एक पेंडी असे वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीनच्या गुळीला चांगला भाव मिळू लागला आहे. दुष्काळी परिस्थितीत सोयाबीनची गुळी जनावरांसाठी चारा म्हणून वापरली जात आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना सुरु कराव्यात, अशी मागणी होत आहे.