परभणी : विवाहितेचा जाळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:04 AM2018-08-05T00:04:15+5:302018-08-05T00:05:03+5:30

चारित्र्याचा संशय घेऊन विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Parbhani: Married to a marriage | परभणी : विवाहितेचा जाळून खून

परभणी : विवाहितेचा जाळून खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): चारित्र्याचा संशय घेऊन विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पूर्णा तालुक्यातील शेख राजूर येथील कविता हिचा विवाह पिंपळगाव बा. येथील मच्छिंद्र रामराव बनसोडे याच्याशी झाला होता. काही दिवसांपूर्वी कविता बनसोडे यांचा चुलत दीर धोंडीबा बनसोडे याने कविता हिचे गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला दिली. याच कारणावरून पती मच्छिंद्र व सासू, सासऱ्यांनी कविताला त्रास देण्यास सुरुवात केली. १८ जुलै रोजी तिला मारहाण केली व तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिस पेटवून दिले. कविता हिच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान तिचा २० जुलै रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी कविता यांचा भाऊ शेषराव गंगाधर साखरे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती मच्छिंद्र बनसोडे, सासरा रामराव बनसोडे, सासू राहिबाई बनसोडे, धोंडीबा बनसोडे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार विनोद रत्ने तपास करीत आहेत. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Parbhani: Married to a marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.