परभणी : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रुग्णसेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:16 PM2018-10-10T23:16:18+5:302018-10-10T23:16:52+5:30
ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविणाºया ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे़ त्याचबरोबर एक्स-रे टेक्नीशियन, शिपाई, परिचारक यांचीही पदे अनेक दिवसांपासून न भरल्याने रुग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविणाºया ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे़ त्याचबरोबर एक्स-रे टेक्नीशियन, शिपाई, परिचारक यांचीही पदे अनेक दिवसांपासून न भरल्याने रुग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे़
पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत परिसरातील ४० गावांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाते़ तालुक्याचे क्षेत्रफळ पाहता या रुग्णालयात एका वैद्यकीय अधीक्षकांसह तीन वैद्यकीय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु, मागील अनेक महिन्यांपासून नियुक्ती असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी या दीर्घकालीन रजेवर गेल्या आहेत़ तसेच काही दिवसांपूर्वी एका डॉक्टराची इतरत्र बदली झाली आहे़ सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयाची सर्व जबाबदारी एका वैद्यकीय अधिकाºयावर आहे़ रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत़ रुग्णालयाच्या विस्तारानंतर हे ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे झाले आहे़ ग्रामीण भागातून रात्री-अपरात्री येणाºया रुग्णांची संख्या मोठी आहे़ तालुक्यात लहान मुलांमध्ये गोवर, कांजण्या यासोबत डेंग्यू सदृश्य रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे़ महिला रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे़ त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयात वेळेवर रुग्णांना सेवा देण्यासाठी मंजूर पदे भरणे आवश्यक असताना वरिष्ठ अधिकाºयांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे़
त्यामुळे पूर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातून आरोग्य विभागाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे़ वैद्यकीय अधिकाºयांच्या रिक्त पदांबरोबरच रुग्णालयातील एक्स-रे तज्ज्ञ, परिचारक, परिचारिका यांचीही पदे रिक्त आहेत़ तर सफाई कर्मचाºयांच्या अपुºया संख्येमुळे रुग्णालय व परिसरात दुर्गधी, अस्वच्छता पहावयास मिळत आहे़
औषधींचा तुटवडा
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना दिल्या जाणाºया औषधींचा तुटवडा आहे़ परिणामी औषधी रुग्णांना व नातेवाईकांना बाहेरून खरेदी कराव्या लागतात़ त्याचबरोबर रेबीज प्रतिबंधक लसीचाही या रुग्णालयात नेहमीच तुटवडा भासतो़
एकाच डॉक्टरवर रुग्णालयाचा भार
रिक्त पदांमुळे संपूर्ण रुग्णालयाची जबाबदारी एकाच वैद्यकीय अधिकाºयावर आहे़ रात्री-अपरात्री व गंभीर रुग्णांच्या उपचारा प्रसंगी या वैद्यकीय अधिकाºयावर अतिरिक्त ताण येतो़ तसेच रुग्णांच्या नातेवाईकांचा रोषही सहन करावा लागत आहे़ तालुक्यात मोठ्या प्रमाणात साथीच्या रुग्णांची वाढ झाली आहे़ अशास्थितीत ग्रामीण रुग्णालयात असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांची संख्या कमी असणे ही गंभीर बाब आहे़ याबाबत आपण पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे रिक्त पदांबाबत पाठपुरावा करणार आहोत़
-विशाल कदम,
जिल्हाप्रमुख, शिवसेना
ग्रामीण रुग्णालयात असलेल्या तीन वैद्यकीय अधिकाºयांपैकी महिला अधिकारी या रजेवर आहेत़ तर एका वैद्यकीय अधिकाºयाची बदली झाली आहे़
-डॉग़ाडेकर, वैद्यकीय अधीक्षक, पूर्णा