परभणी : राष्ट्रवादीच्या बैठकीत नावावर मतैऐक्य होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:47 AM2019-01-05T00:47:58+5:302019-01-05T00:48:21+5:30

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मुंबई येथील बैठकीत चार इच्छुकांची नावे कायम असल्याने नावाबाबत मतैऐक्य झाले नसल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट झाली.

Parbhani: In the meeting of Nationalist Congress Party, | परभणी : राष्ट्रवादीच्या बैठकीत नावावर मतैऐक्य होईना

परभणी : राष्ट्रवादीच्या बैठकीत नावावर मतैऐक्य होईना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मुंबई येथील बैठकीत चार इच्छुकांची नावे कायम असल्याने नावाबाबत मतैऐक्य झाले नसल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट झाली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची शुक्रवारी मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत परभणी लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची पुन्हा एकदा चाचपणी करण्यात आली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, खा.सुप्रिया सुळे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. पक्षाचे परभणी महानगराध्यक्ष स्वराजसिंह परिहार आणि माजी महापौर प्रताप देशमुख यांनी माजी जि.प.उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. जामकर यांचे नेटवर्क व जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास पक्षाला फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. माजी खा.सुरेश जाधव यांनीही आपणास उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी आ. विजय भांबळे यांच्या नावावरची चर्चा झाली; परंतु भांबळे यांनीच याबाबत अनुत्सुकता दाखविली. परभणीच्या जागेसाठी चार इच्छुकांची नावे आल्याने व एका नावावर मतैऐक्य होत नसल्याने उमेदवाराची निश्चिती पक्षश्रेष्ठींनीच करण्याचा निर्णय यावेळी घेतला. याबाबतच्या नावाची घोषणा नंतर केली जाईल, असे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अनिल नखाते, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, अजय चौधरी, किरण सोनटक्के आदींची उपस्थिती होती.

Web Title: Parbhani: In the meeting of Nationalist Congress Party,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.