परभणी : कामाच्या शोधार्थ मजुरांचे शहराकडे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:30 AM2018-10-10T00:30:15+5:302018-10-10T00:31:09+5:30

अल्प पावसामुळे शेती पिकली नाही़ त्यामुळे कामाच्या शोधार्थ तालुक्यातील मोलमजुरी करून उदारनिर्वाह करणारे मजूर शहराकडे धाव घेत आहेत़ तर दुष्काळी परिस्थितीने संकटात सापडलेले अल्पभूधारक शेतकरी ऊस तोडणीच्या कामाला जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे़

Parbhani: Migrating the laborers to the city in search of work | परभणी : कामाच्या शोधार्थ मजुरांचे शहराकडे स्थलांतर

परभणी : कामाच्या शोधार्थ मजुरांचे शहराकडे स्थलांतर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): अल्प पावसामुळे शेती पिकली नाही़ त्यामुळे कामाच्या शोधार्थ तालुक्यातील मोलमजुरी करून उदारनिर्वाह करणारे मजूर शहराकडे धाव घेत आहेत़ तर दुष्काळी परिस्थितीने संकटात सापडलेले अल्पभूधारक शेतकरी ऊस तोडणीच्या कामाला जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे़
पावसाळ्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना लागवड खर्चापेक्षाही कमी उत्पन्न मिळाले़ यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे़ तालुक्यातील पर्जन्यमान घटल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ शासन दरबारी वार्षिक सरासरीनुसार ६० टक्के पाऊस तालुक्यात झाल्याची नोंद आहे़; परंतु, तालुक्यातील साठवण तलाव, पाझर तलाव, मासोळी प्रकल्पात पाणी साचले नाही़ आॅक्टोबरचा दुसरा आठवडा संपत आला तरी परतीच्या पावसाने हजेरी लावली नसल्याने रबी हंगामाच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
रबी हंगामाच्या पूर्व मशागतीची कामे पूर्णत: ठप्प झाली आहेत़ शेतमजूरी करून आपल्या कुटूंबाची उपजीविका भागविणाºया शेतमजुरांबरोबर अल्पभूधारक शेतकरीही मोठ्या संकटात सापडला आहे़
मजुरीची कामे करणाºया मजुरांनी कामाच्या शोधार्थ आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे़ मात्र तालुक्यात कुठलेही मोठे उद्योग नसल्याने औरंगाबाद, मुंबई, पुणे, नाशिक आदी मोठ्या शहरांकडे लोंढे जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे़ शेतीत उत्पन्न न मिळाल्याने अल्पभूधारक शेतकरी आपल्यावर ओढावलेले आर्थिक संकट टाळण्यासाठी ऊस तोडणीच्या कामाला जाण्यासाठी ऊस तोडणी मुकादमाकडून उचल घेत आहेत़ गेल्या पाच वर्षांपासून जेमतेम पडणाºया पावसामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे तसेच भविष्यात भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे़ त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई व मजुरांना गावातच काम उपलब्ध होईल, यासाठी पावले उचलावीत़ नोव्हेंबर महिन्याची वाट न पाहता गोदावरी नदीपात्रातून वाहून जाणारे पाणी मुळी बंधारा तसेच धारखेड-गंगाखेड रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात कच्चा बंधारा उभारून पाणी आडवावे, अशी मागणी होत आहे़
दुष्काळाची दाहकता वाढली
गंगाखेड तालुक्यात दीड महिन्यापासून पाऊस झाला नाही़ त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व कापूस ही पिके शेतकºयाच्या हातून गेली आहेत़ त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ विशेष म्हणजे शेतकरीच अडचणीत असल्याने शेतीवर अवलंबून असलेल्य मजुरांच्या हातालाही काम मिळत नाही़ त्यामुळे शेतकºयांबरोबरच मजुरांच्याही अडचणीत भर पडली आहे़ त्यामुळे मजुरांना आपल्या कुटूंबाची उपजीविका भागविण्यासाठी कामे मिळविण्यासाठी घर सोडण्याची वेळ आली आहे़
रोहयोही : ठप्प
गंगाखेड पंचायत समिती कार्यालयाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत शौच खड्डे, शौचालय, घरकूल, तुती लागवड, बांधावरील वृक्ष लागवड, फळ लागवडीची सुमारे २७२६ कामे मंजूर आहेत़ मात्र यातील शौच खड्डे १५०, शौचालय १२५, घरकूल २८०, तुती लागवड ८० असे अंदाजे ६३५ कामे सुरू असल्याची माहिती मिळाली़
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़
विशेष म्हणजे रोजगार हमी योजनेंतर्गत कामे उपलब्ध व्हावीत, यासाठी तालुक्यातील सुमारे ३० हजार मजुरांनी नोंदणी केली आहे़ मंजूर कामे सुरू होत नसल्याने नोंदणी केलेल्या मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होत नसल्याने ही परिस्थिती ओढालवली आहे़

Web Title: Parbhani: Migrating the laborers to the city in search of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.