परभणी : येलदरीसह निम्न दुधनाही मृतसाठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:32 AM2019-03-03T00:32:47+5:302019-03-03T00:33:11+5:30

जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठले असून, येलदरी पाठोपाठ आता निम्न दुधना प्रकल्पही मृतसाठ्यात गेल्याने टंचाईमध्ये भर पडण्याची भीती निर्माण झाली आहे़

Parbhani: The milk with Yeladri is also dead | परभणी : येलदरीसह निम्न दुधनाही मृतसाठ्यात

परभणी : येलदरीसह निम्न दुधनाही मृतसाठ्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठले असून, येलदरी पाठोपाठ आता निम्न दुधना प्रकल्पही मृतसाठ्यात गेल्याने टंचाईमध्ये भर पडण्याची भीती निर्माण झाली आहे़
जिल्ह्यातील शहरी भागांना पाणीपुरवठा करण्याची भिस्त येलदरी आणि निम्न दुधना या प्रमुख प्रकल्पांवर आहे़ मात्र मागील तीन वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा होत असल्याने प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा जमा होत नाही़ परिणामी, पाणीटंचाईचे संकट गंभीर होत आहे़ मागील वर्षी येलदरी प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने परभणी, पूर्णा शहराला निम्न दुधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागले़ यावर्षीच्या उन्हाळ्यातही निम्न दुधना प्रकल्पामध्ये परभणी, पूर्णा शहरासाठी पाणीसाठा राखीव ठेवला होता़ येलदरी प्रकल्पात पाणी नसल्याने निम्न दुधनातून पाणी घेण्यात आले़ परंतु, निम्न दुधना प्रकल्पानेही तळ गाठला आहे़ ३४४़८०० दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा मृतसाठा १०२ दलघमी क्षमतेचा आहे़ तर जिवंत पाणीसाठा २४२ दलघमी क्षमतेचा आहे़ सद्यस्थितीला उपलब्ध माहितीनुसार निम्न दुधना प्रकल्पामध्ये जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिलेला नाही़ या प्रकल्पात १०२ दलघमी एकूण पाणीसाठा शिल्लक असून, हा सर्वसाठा मृतसाठ्यातील आहे़ गतवर्षी याच प्रकल्पात ५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता़ मात्र यावर्षी ० टक्के पाणीसाठा राहिल्याने आगामी काळातील टंचाईचे संकट आणखीच गडद झाले आहे़ येलदरी प्रकल्पात यापूर्वीच जिवंत पाणीसाठा संपला असून, आता दोन्ही प्रकल्पांमध्ये जिवंत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे़
केवळ ११ दलघमी पाणी उपलब्ध
४जिल्ह्यातील कोरड्या प्रकल्पांची संख्या दररोज वाढत चालली आहे़ पाणीसाठा नसल्याने टंचाईची परिस्थिती गंभीर स्वरुप धारण करीत आहे़ परभणी जिल्ह्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये २़२१९ दलघमी, मानवत तालुक्यातील झरी प्रकल्पात १़४०४ दलघमी, जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात २़८५४ दलघमी आणि डिग्रस बंधाऱ्याध्ये ४़६६० दलघमी असा एकूण ११़१३७ दलघमी पाणीसाठा जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे़ परभणी, पूर्णा या मोठ्या शहरांना दोन महिन्यांना २ दलघमी पाणीसाठा लागतो़ तसेच इतर शहरांनाही पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासणार आहे़ प्रत्यक्षात प्रकल्पात पाणी नसल्याने आगामी काळात पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे़
सहा प्रकल्प कोरडेठाक
४जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना या प्रमुख प्रकल्पांबरोबरच इतर चार प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे़
४गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नसून गोदावरी नदीवर बांधलेला मुदगल, ढालेगाव आणि मुळी बंधारा कोरडाठाक पडला आहे़
४डिग्रस बंधाºयामध्ये केवळ ४़५ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़ तर जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पात २़८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे़

Web Title: Parbhani: The milk with Yeladri is also dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.