परभणी : भारनियमन वाढविल्याने मनसेने भेट दिला कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:27 AM2018-10-16T00:27:23+5:302018-10-16T00:28:04+5:30
शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले.
नवरात्र काळात विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने नऊ तासांचे भारनियमन करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. या निर्णयामुळे विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय कोलमडले आहेत. यापूर्वी शहरात केवळ तीन तास भारनियमन होत होते. सोमवारपासून तीन टप्प्यात नऊ तास भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारनियमन वाढविल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मनसेने सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शेख राज, गुलाब रोडगे, गणेश भिसे, निजलिंगअप्पा तरवडगे, गणेश निवळकर, अशोक शेलार, प्रभूराज तेवर, सय्यद जावेद यांनी मेश्राम यांना निवेदन दिले. तसेच जय भवानी नवरात्री महोत्सव, जगदंबा देवी संस्थान, श्री सरस्वती नवरात्र महोत्सव, अष्टभूजा नवरात्र महोत्सव आदी मंडळाच्या वतीनेही निवेदन देऊन भारनियमन बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.
सोमवारी सहा तासच भारनियमन
महावितरण कंपनीने नऊ तास भारनिययमन करण्याचा निर्णय घेतला असला तरी सोमवारी मात्र सहा तासांचेच भारनियमन करण्यात आले. तिसºया टप्यातील सायंकाळी ६ ते ९ या वेळेतील भारनियमन झाले नाही. त्यामुळे शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.