परभणी : सेलू येथे मनसेने रेल्वे रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:18 AM2018-10-31T00:18:07+5:302018-10-31T00:18:35+5:30
नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वेमध्ये चढ्या दराने खाद्य पदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील रेल्वेस्थानकावर ५ मिनिटे रेल्वे रोखून धरली़
ेलोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वेमध्ये चढ्या दराने खाद्य पदार्थांची विक्री करून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील रेल्वेस्थानकावर ५ मिनिटे रेल्वे रोखून धरली़
रेल्वेस्थानकावरील कँटीनमधूनही अव्वाच्या सव्वा दराने खाद्य पदार्थ विक्री होतात़ ५ रुपयांचा चहा १० रुपयांना, १५ रुपयांची पाणी बॉटल २० रुपयांना विक्री केली जात आहे़ तेव्हा रेल्वे प्रशासनाने सेलू येथील कँटीनचे टेंडर रद्द करावे, या मागणीसाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष शेख राज, रुपेश सोनटक्के, सचिन पाटील, सुशीलताई चव्हाण, अनिल बुचाले, अर्जुन टाक, गुलाबराव रोडगे, गणेश नेवाळकर, सय्यद जावेद, प्रभूराज तेवर, शेख यास्मीन, दिलीप डहाळे, कृष्णा कदम, राजेश यादव, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते़
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक रेल्वे रोखो आंदोलन केल्याने रेल्वेतील प्रवाशांना काय झाले हेच कळाले नाही़ यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या अधिकाºयांच्या निदर्शनास दरवाढीची बाब आणून दिली़ या घटनेची रेल्वे पोलिसात नोंद झाली नव्हती़