परभणी : उद्या ईव्हीएमवर मॉकपोल घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:40 AM2019-08-21T00:40:41+5:302019-08-21T00:41:17+5:30
आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी अंतीम टप्प्यात असून, या अंतर्गत २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान, मॉकपोल घेणार असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी सांगितले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी अंतीम टप्प्यात असून, या अंतर्गत २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान, मॉकपोल घेणार असल्याचे जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी सांगितले़
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी प्राप्त ईव्हीएमपैकी राखीव ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीसाठी तामिळनाडू राज्यातील धर्मपुरी आणि चेन्नई येथून प्राप्त झालेले २ हजार १७० बॅलेट युनिट, १ हजार ६८० कंट्रोल युनिट आणि १ हजार ८४० व्हीव्हीपॅट मशीन शहरातील कल्याण मंडपम् येथील सभागृहात ठेवण्यात आल्या आहेत़ या प्राप्त ईव्हीएम मशीनची भारत इलेक्टॉनिक्स लि़ कंपनीच्या बेंगलोर येथील अभियंत्यांच्या उपस्थितीत प्रथम तपासणी करण्यात आली आहे़ या तपासणी दरम्यान शिवसेना, भाजपा, बसपा, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधींनी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली़ या पार्श्वभूमीवर २२ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत प्राप्त ईव्हीएम मशीनपैकी ५ टक्के मशीनवर ५००, १००० आणि १२०० मतदान करण्यात येणार आहे़ यावेळी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिनिधींना कल्याण मंडपम् येथे पाठवावे व मॉकपोलची प्रत्यक्ष पाहणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी केले आहे़