परभणी : मारहाण करून महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:29 PM2019-07-04T23:29:19+5:302019-07-04T23:29:38+5:30
शेत धुऱ्याच्या वादातून एका महिलेस मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे २८ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन २ जुलै रोजी ५ आरोपींविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणी (परभणी): शेत धुऱ्याच्या वादातून एका महिलेस मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे २८ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन २ जुलै रोजी ५ आरोपींविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी रामभाऊ कनीराम आडे, अमोल रामभाऊ आडे, शाम रामभाऊ आडे, बेबाबाई रामभाऊ आडे, सोनू अमोल आडे यांनी धुºयाच्या वादातून लोखंडी गज आणि काठीने मारहाण केली. तसेच अर्धविवस्त्र करुन विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर जखमी महिलेवर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथेच पीडित महिलेने जबाब नोंदविला. त्यावरुन पाच जणांविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बामणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन काशीकर तपास करीत आहेत.
बुटावरुन शोधला आरोपी
४परभणी- चोरी करुन पळून गेलेल्या एका आरोपीस घटनास्थळावर सापडलेल्या एका बुटावरुन पोलिसांनी शोधून काढले आहे. शहरातील सारनाथ कॉलनी भागातील अशोक गंगाराम ढाकरगे यांची म्हैस २७ जून रोजी कॅनॉल परिसरातील गोठ्यातून चोरीला गेली होती.
४याप्रकरणी अशोक ढाकरगे यांनी १ जुलै रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनंतर हेकॉ.विष्णू जाधव, भास्कर मुंडे, दत्ता गोंगाणे, ज्ञानेश्वर कांगणे आदींनी घटनास्थळी भेट दिली, तेव्हा आरोपीने चोरी केल्यानंतर त्याचा बुट घटनास्थळावर सोडून पळ काढल्याचे निदर्शनास आले.
४या बुटावरुन पोलिसांनी माहिती काढली असता संशयित आरोपी मंचक गंगाराम धुळगुंडे हा नांदेड तालुक्यातील वाघी येथे असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तातडीने वाघी हे गाव गाठून आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे चोरुन नेलेली म्हैसही जप्त करण्यात आली आहे.