परभणी : पाच दिवसानंतर आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:20 AM2018-01-02T00:20:50+5:302018-01-02T00:20:56+5:30
हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी २८ डिसेंबरपासून शेतकरी संघटनेने सुरु केलेले धरणे आंदोलन १ जानेवारी रोजी नाफेडच्या अधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी :हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी २८ डिसेंबरपासून शेतकरी संघटनेने सुरु केलेले धरणे आंदोलन १ जानेवारी रोजी नाफेडच्या अधिकाºयांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने २८ डिसेंबरपासून धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख व इतर शेतकरी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
पाच दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनामध्ये सोमवारी सकाळपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे परिसरातील १६ गावांमध्ये शेतकºयांनी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २ जानेवारी रोजी बोरी बाजारपेठ बंद ठेवून रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाराºयानंतर शासकीय यंत्रणा हालली. बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे यांनी नाफेडच्या अधिकाºयांना संपर्क करुन आॅनलाईन नोंदणी केंद्राची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर नाफेडच्या अधिकाºयांनी बाजार समितीच्या अधिकाºयांना आॅनलाईन नोंदणी केंद्राची व तूर, हरभरा हमीभाव केंद्राची परवानगी दिल्याचे पत्र पाठविले. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे, बाजार समितीचे सचिव गाडेकर यांच्या हस्ते शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांना हे पत्र देण्यात आले. त्यामुळे पाच दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी दिली.