परभणी : आश्वासनानंतर आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:06 AM2018-01-14T00:06:04+5:302018-01-14T00:06:25+5:30
येथील देशी दारुचे दुकान गावाबाहेर हलवावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारपासून सुरू केलेले धरणे आंदोलन शनिवारी सायंकाळी ५़३० वाजता मागे घेण्यात आले़ दुकानाच्या मालकाने हे दुकान गावाबाहेर हलविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली़
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी: येथील देशी दारुचे दुकान गावाबाहेर हलवावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी शुक्रवारपासून सुरू केलेले धरणे आंदोलन शनिवारी सायंकाळी ५़३० वाजता मागे घेण्यात आले़ दुकानाच्या मालकाने हे दुकान गावाबाहेर हलविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली़
१ आॅक्टोबर २०१७ रोजी ग्रामसभेत गावातील दारुचे दुकान गावाबाहेर हलविण्याचा ठराव घेण्यात आला होता़ तेव्हापासून भाजप आघाडीच्या आशाताई गायकवाड यांनी दुकान हलविण्याबाबत पाठपुरावा केला़ परंतु, या पाठपुराव्याची दखल न घेतल्याने राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त १२ जानेवारीपासून आशाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दारु दुकानासमोरच धरणे आंदोलन सुरू करण्यात आले़ दरम्यान, शनिवारी दिवसभर हे आंदोलन चालले़ माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर दुकान मालकाने तीन महिन्यांत हे दुकान गावाबाहेर हलविण्याचे लेखी आश्वासन दिले़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती आशाताई गायकवाड यांनी दिली़ आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी डॉ़ विद्याताई चौधरी, पंडित घोलप, अमृतराव चौधरी, शिवलिंग भिसे, श्याम ठोकळ, विष्णू चौधरी, बाबू काजी, गुलाब चौधरी, तान्हाजी चौधरी, दासराव कनकुटे, दिनकर चौधरी, ओंकार चौधरी, मुंजाभाऊ मगर, अंबादास गजमल, संगीता अंकुशे, मनोज शिंपले, दीपक प्रधान यांनी पुढाकार घेतला़