परभणी : दुसºया दिवशीही आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:55 AM2017-12-30T00:55:16+5:302017-12-30T00:56:12+5:30
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी सुरु केलेले आंदोलन शुक्रवारीही सुरुच होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी सुरु केलेले आंदोलन शुक्रवारीही सुरुच होते.
बोरी बाजार समितीसमोर शेतकरी संघटनेच्या वतीने २८ डिसेंबरपासून हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही. त्यामुळे दुसºया दिवशीही शेतकरी संघटनेने आंदोलन सुरुच ठेवले.
या आंदोलनाला शहरातील व्यापाºयांनी बीट बंद ठेवून पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरु होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात शेतकरी संघटनेने म्हटले आहे. आंदोलनामध्ये अध्यक्ष गजानन देशमुख, रामेश्वर बारवकर, रामकिशन भांबट, राजाभाऊ गोरे, गोपीनाथ गुंजावळ, पांडुरंग वारे आदी सहभागी झाले आहेत.