परभणी : भाकप, औषधी विक्रेत्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:54 AM2019-01-09T00:54:42+5:302019-01-09T00:54:53+5:30

तालुक्यातील औषधी विके्रत्यांच्या वतीने मंगळवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला़ उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून शिंगारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी संदीप टाक, सुनील डख, जयप्रकाश झंवर, अर्जुन निर्वळ, प्रवीण लोया आदींची उपस्थिती होती़ विक्रेत्यांनी एक तास दुकाने बंद ठेवून आॅनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शविला़ ४मानवतमध्ये भाकपचे धरणे

Parbhani: The movement of the CPI and the medicines | परभणी : भाकप, औषधी विक्रेत्यांचे आंदोलन

परभणी : भाकप, औषधी विक्रेत्यांचे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : तालुक्यातील औषधी विके्रत्यांच्या वतीने मंगळवारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला़ उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून शिंगारे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी संदीप टाक, सुनील डख, जयप्रकाश झंवर, अर्जुन निर्वळ, प्रवीण लोया आदींची उपस्थिती होती़ विक्रेत्यांनी एक तास दुकाने बंद ठेवून आॅनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शविला़
४मानवतमध्ये भाकपचे धरणे
मानवत : दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लिंबाजी कचरे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागेल त्याला रोहयोचे काम द्यावे, मजुरांच्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्ती प्रमाणे पाच किलो धान्य २ रुपये किलो दराने वाटप करावे, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज मंजूर करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या़ तहसीलदार डी़डी़ फुपाटे यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी अशोक बुरखुंडे, क्रांती बुरखुंडे, रामराजे महाडिक, बालासाहेब आळणे आदींची भाषणे झाली़ यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.
सोनपेठमध्येही आंदोलन
४सोनपेठ- येथील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ तहसीलदार जीवराज डापकर यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी तालुकाध्यक्ष संतोष निर्मळे, सुरेश लोढा, आनंद गुजराथी, राहुल लोहगावकर, लहुकुमार वाकणकर, महेश शर्मा, मोहन खोडवे, शशिकांत शेटे, श्रीकांत मेहत्रे, वैभव कुलकर्णी, परमेश्वर राठोड आदींसह व्यापारी उपस्थित होते़
४पाथरीत भाकपचा रास्ता रोको
पाथरी: पैठण डाव्या कालव्यात पाणी सोडावे, शेतकऱ्यांचा पीक विमा अदा करावा, उसाला एफआरपी प्रमाणे दर द्यावेत, आदी मागण्यांसाठी सेलू कॉर्नर येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ दुपारी १ ते २ यावेळेत हे आंदोलन झाले़ आंदेलनानंतर नायब तहसीलदार नवगिरे यांना निवेदन सादर करण्यात आले़ यावेळी जिल्हा सेक्रेटरी दीपक लिपणे, भागवत कोल्हे, लिंबाजी कचरे पाटील, भारत गायकवाड, बालासाहेब आळणे आदींसह शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते़

Web Title: Parbhani: The movement of the CPI and the medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.