परभणी : बोरीत शेतकऱ्यांचे बँकेसमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:34 AM2018-09-29T00:34:30+5:302018-09-29T00:35:12+5:30
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावेत, शाखाधिकाºयांना निलंबित करावे, या मागणीसाठी आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बँकेसमोर धरणे धरण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावेत, शाखाधिकाºयांना निलंबित करावे, या मागणीसाठी आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बँकेसमोर धरणे धरण्यात आले.
भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत मुद्रा, व्यापाºयांच्या सीसी फाईल, शैक्षणिक कर्ज, पीक कर्ज यासह आदी कर्जांचे प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. शाखाधिकाºयांशी वारंवार संपर्क करुनही कोणतेही पाऊले उचलण्यात येत नसल्याने आ.विजय भांबळे यांनी विविध कर्ज प्रकरणे निकाली काढण्यात यावीत, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता बँकेसमोर धरणे आंदोलन सुरु केले. पाच तास चाललेल्या आंदोलनानंतर उपविभागीय अधिकारी यु.एस. पारधे, तहसीलदार सुरेश शेजूळ, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील हट्टेकर, एसबीआयचे मुख्य प्रबंधक चारुदत्त विश्वासराव, जि.प. समाजकल्याण अधिकारी एस.के. भोजने, तलाठी नितीन बुड्डे हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यानंतर सर्व प्रलंबित कर्ज प्रकरणे १५ दिवसांच्या आत निकाली काढण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात जि.प. सदस्य अजय चौधरी, विश्वनाथ राठोड, मनोज थिटे, अभिनव राऊत, विजय खिस्ते, सुभाष घोलप, सरपंच सखाराम शिंपले, शशिकांत चौधरी, राजू नागरे, नंदकुमार अंभोरे, विजयकुमार चौधरी, संजय अंभुरे, सचिन बोबडे, करुण नागरे, अर्जून वजीर यांच्यासह बोरी परिसरातील शेतकरी, व्यापारी, महिला, शेतमजूर आदींचा सहभाग होता.