परभणी: मुद्गल बंधारा मृत साठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:48 PM2019-04-01T23:48:30+5:302019-04-01T23:48:55+5:30

गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Parbhani: Mudgal Bond dead stock | परभणी: मुद्गल बंधारा मृत साठ्यात

परभणी: मुद्गल बंधारा मृत साठ्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : गोदावरी नदीपात्रातील मुदगल बंधाऱ्याची सध्या पाणीपातळी पूर्णत: खालावली असून हा बंधारा मृत साठ्यात गेला आहे. त्यामुळे पाथरी शहराच्या पाण्याच्या प्रश्नासह २ हजार २४२ हेक्टवरील शेत जमिनीच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पाथरी तालुक्यात मागील तीन ते चार वर्षापासून दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. यावर्षीही पूर्ण पावसाळ्यात केवळ दोन महिने पाऊस पडला. तर सप्टेंबर, आॅक्टोबर ही दोन महिने पूर्णत: कोरडी गेली आहेत. ५० टक्के कमी पाऊस झाल्याने यावर्षी तालुक्यात राज्य शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर केला. तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन ठिकाणी गोदावरी नदीपात्रात उच्च पातळीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. ढालेगाव येथील बंधाऱ्याची पाणीसाठवण क्षमता १४.८७ दलघमी आहे. तर मुदगलची ११.४८ दलघमी एवढी क्षमता आहे. मागील काही वर्षापासून पाऊस कमी पडत असल्याने दरवर्षी हे बंधारे मार्च महिन्यापूर्वीच कोरडे पडत आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाल्याने ढालेगाव बंधारा जायकवाडीच्या पाण्यामुळे १०० टक्के भरला गेला होता. मात्र आॅगस्ट नंतर पाऊसच पडला नसल्याने पावसाळ्यातच बंधाºयाचे पाणी ५० टक्के पेक्षा कमी झाले होते. याचा फटका खरीप पिकांसोबत रबी हंगामातील पिकांनाही बसला होता. आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत बंधाºयात पाण्याचा बराच उपसा सिंचनासाठी झाला. त्याच बरोबर काही दिवसात वाढलेल्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. मुदगल येथील बंधारा तर सध्या मृत साठ्यात आहे.
त्याच बरोबर ढालेगाव येथील बंधाºयातही मार्च महिन्यात पाणी पातळी ३९०.१०० मीटर म्हणजेच ३.२४ टक्केच आहे. या पाण्यावर पाथरी शहराचा पुढील तीन महिन्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे; परंतु, मृतसाठ्यात असलेल्या या बंधाºयातून शेती सिंचनासाठी पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होणार आहे. त्याच बरोबर २ हजार २४२ हेक्टवरील पिकांनाही मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
जायकवाडीच्या: पाण्यावरच मदार
४तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात दोन बंधारे आहेत. त्याच बरोबर जायकवाडी धरणाचा डावा कालवा या भागातून गेला आहे. त्यामुळे या भागात बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध असल्या तरी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांना पाणी मिळत नाही.
४जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यावर या भागात मोठे सिंचन होते. आॅक्टोबर महिन्यात जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून संरक्षित पाणीपाळी सोडण्यात आली. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवटी या भागात एक पाणी आवर्तन सोडण्यात आले. या पाण्यावर ४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. त्याच बरोबर कालव्यातील पाण्यामुळे सिंचनाच्या स्त्रोताला पाणी राहिले आहे.
४त्यामुळे बºयाच अंशी जायकवाडीच्या पाण्याने पाथरी तालुक्याला तारले असल्याचे दिसून येत आहे.
सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर
ढालेगाव बंधारा कार्यक्षेत्रांंतर्गत ढालेगाव, रामपुरी, निवळी, पाटोदा, गोपेगाव, मरडसगाव, बानेगाव, मंजरथ तर माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव, पुरुषोत्तम पुरी, जायक्याचीवाडी, सादोळा, गंगामसला, सावंगी यासह इतर गावातील २ हजार २४२ हेक्टर शेती सिंचनाखाली येते; परंतु, मार्च महिन्यात या बंधाºयात केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे भविष्यात बंधारा कार्यक्षेत्रात येणाºया पाथरी व माजलगाव तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Parbhani: Mudgal Bond dead stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.