परभणी- मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:49 AM2020-01-31T00:49:23+5:302020-01-31T00:49:44+5:30
परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. दुहेरी रेल्वेमागार्चे काम अंतिम टप्प्यात आले असून ५ फेब्रुवारीपर्यंत या रेल्वेमागार्ची सुरक्षा चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
अतुल शहाणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा: परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. दुहेरी रेल्वेमागार्चे काम अंतिम टप्प्यात आले असून ५ फेब्रुवारीपर्यंत या रेल्वेमागार्ची सुरक्षा चाचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
परभणी ते मुदखेड या दुहेरी रेल्वेमागार्ला २०१२ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत ३९० कोटी ६० लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात परभणी ते मिरखेल या १७ कि.मी.दुहेरी रेल्वेमागार्चे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर दुसºया टप्प्यात लिंबगाव ते नांदेड या १९ कि.मी. रेल्वेमागार्चे पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आता तिसºया टप्प्यात रेल्वे मागार्चे पूर्ण काम करण्याचे उद्दिष्ट या विभागाकडून ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदरील यंत्रणा कामामध्ये मोठ्या प्रमाणात व्यस्त होती. परभणी ते पूर्णा या मार्गावरील पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाच्या कामाला वेळ लागत होता. त्यामुळे या पुलाचे काम प्राधान्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर केले. दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक भुपेंद्रसिंग यांनी पूर्णा येथील भेटी दरम्यान हा मार्ग एका महिन्याच्या कालावधीत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने माहिती घेतली असता परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी. दुहेरी रेल्वे मागार्चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता केवळ रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या नॉन इंटर लॉकिंग, सिग्नल यंत्रणा, नवीन रेल्वे पुलांची तपासणी व नवीन मागार्ची सुरक्षा चाचणी ही कामे शिल्लक राहिली आहेत. पाच तारखे पासून नॉन इंटर लोकींग चे काम सुरू होईल त्या नंतर सिंगनल यंत्रणेची १० ते १२ फेब्रु दरम्यान सुरक्ष चाचणी झाल्यानंतर हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी १५ ते १७ फेब्रु दरम्यान खुला होण्याची शक्यता आहे. यामुळे परभणी ते मुदखेड या रेल्वे मार्गावरील एक्सप्रेस व लोकल रेल्वे उशिराने धावण्याचे प्रमाण कमी होणार आहे. परिणामी परभणी ते नांदेड व नांदेड ते औरंगाबाद हे प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे सुरक्षा चाचणीकडे लक्ष लागले आहे.
तीन वर्षात २४४ कोटी खर्च
४परभणी ते मुदखेड या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी मागील तीन वर्षात २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०१२-१३ मध्ये या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. या रेल्वेमार्गाचा प्रकल्प एकूण खर्च ३९० कोटी ६० लाख रुपयांचा आहे. केंद्र शासनाने या रेल्वेमार्गाला टप्प्याटप्याने निधी दिला आहे. आणखी काही कामे करण्यासाठी प्रशासनाला निधीची आवश्यकता आहे. या मार्गावरील लहान व मोठ्या पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पूर्णा नदीवरील रेल्वे पुुलाचे काम पूर्ण करणे हे रेल्वे विभागासाठी मोठे आव्हान होते. या कामात रेल्वे प्रशासनाला अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करुन प्रशासनाने या पुलाचे काम पूर्ण केले आहे.