परभणी : व्यंकटी शिंदेसह टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:56 PM2020-01-15T23:56:41+5:302020-01-15T23:57:08+5:30

येथील व्यंकटी मुंजाजी शिंदे व टोळीतील निष्पन्न झालेल्या १२ सदस्यांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Parbhani: Mukkah action against gangs with a venomous Shinde | परभणी : व्यंकटी शिंदेसह टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई

परभणी : व्यंकटी शिंदेसह टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील व्यंकटी मुंजाजी शिंदे व टोळीतील निष्पन्न झालेल्या १२ सदस्यांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या प्रस्तावाला नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या संदर्भातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी- येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी व स्वत:च्या टोळीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी रोडे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी रवि गायकवाड याचा खून करण्याचा कट टोळीप्रमुख व्यंकटी शिंदे व सदस्यांनी रचला होता. १ जानेवारी रोजी पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट फसला. याच दिवशी पोलिसांनी या टोळीतील शेख फेरोज शेख सलीम याच्याकडून एक रिव्हॉल्वर, एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसे तसेच टोळी सदस्य देवेंद्र ऊर्फ बो श्रीनिवास देशमुख याच्याकडून कोयता व खंजीर जप्त केले होते. तसेच या प्रकरणात सचिन अनिल पवार, मनोज भगवान पंडित यांना अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी व्यंकटी शिंदे व टोळीने केलेल्या गुन्ह्यांची तपासणी केली असता खुनाचे ३, खुनाचा प्रयत्न करण्याचे ७ व इतर असे ४२ गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. या टोळीची कामकाजाची पद्धत हिंसक असून सुपारी घेऊन खून करणे, दोन पक्षाच्या वादातील पैशांच्या वसुलीसाठी सुपारी घेणे, भर दिवसा खून घडवून आणणे आदी प्रकार सातत्याने केले जात होते.
तसेच व्यंकटी शिंदे व भैय्या ऊर्फ नितेश प्रकाश देशमुख यास यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची व खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात व्यंकटी शिंदे याला ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. हे सर्व अभिलेखे एकत्र करुन त्याची पडताळणी करण्यात आली.
त्यानंतर या टोळीविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा १९९९ (मोक्का) चे कलम ३ (१) (्र्र) , ३ (२), ३ (४) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या शिफारशीने विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सहा टोळीतील ५० सदस्यांविरुद्ध मोक्का
४पोलिसांनी आतापर्यंत ६ टोळीतील ५० सदस्यांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. त्यातील १४ आरोपी कारागृहात जेरबंद असून १९ आरोपी फरार आहेत.
४ विशेष म्हणजे यापूर्वी तीन गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी दिली असल्याने त्यांच्याविरुद्धच्या कारवाईत खटले न्यायप्रविष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Mukkah action against gangs with a venomous Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.