परभणी महापालिका :१८ कोटींच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:33 PM2018-03-20T23:33:49+5:302018-03-20T23:33:49+5:30
शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. या संदर्भात मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद येथील कचºयाचा प्रश्न गाजल्यानंतर महानगरपालिका अंतर्गत शहरांतील कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी मनपांकडून घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात प्रस्ताव मागविण्यात आला होता. परभणी शहरातील कचºयाच्या नियोजनासाठी इंदोर येथील इको प्रो या कंपनीने घनकचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे. साधारणत: १८ कोटी रुपयांचा हा आराखडा असून, त्यात कचºयापासून खत निर्मिती केली जाणार आहे. कंपोस्टींग, प्रकल्पासाठी लागणाºया वाहनांची खरेदी, डंपिंग ग्राऊंड विकसित करणे, डंपिंग ग्राऊंडवर स्क्रिनिंग मशीन, वॉचमन रुम आणि या प्रकल्पासाठी लागणारे बांधकाम करणे आदी बाबींचा या प्रकल्पात अंतर्भाव आहे. दरम्यान, परभणी महापालिकेने हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. शनिवारी राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली या बैठक घेण्यात आली. या बैठकीत १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये कचºयाच्या व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्याचा निधी मनपाला प्राप्त होणार असून, त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावास तत्वत: मंजुरी मिळाल्याने शहरातील कचºयाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यास मदत होणार आहे.