परभणी महापालिकेत निधीसाठी अपंगांचे बेमुदत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 05:08 PM2018-07-02T17:08:58+5:302018-07-02T17:09:41+5:30
महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीतून अपंगांसाठी योजना राबवाव्यात, या मागणीसाठी आजपासून जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने धरणे आंदोलन सुरु केले.
परभणी : महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी राखीव असलेल्या ३ टक्के निधीतून अपंगांसाठी योजना राबवाव्यात, या मागणीसाठी आजपासून जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने धरणे आंदोलन सुरु केले आहे.
महानगरपालिकेअंतर्गत अपंगांसाठी ३ टक्के निधी राखीव ठेवला जातो. २.२३ कोटी रुपये शहरात अपंग बांधवांसाठी राखीव असताना मनपा योजना राबवित नाही. २०१५ पासून आजपर्यंत अपंगांना या योजनांपासून वंचित रहावे लागले आहे. तेव्हा हा निधी खर्च करण्याची तत्काळ परवानगी द्यावी, याच निधीतून अपंगांसाठी पेंशन योजना सुरु करावी, या मागण्यांसाठी परभणी जिल्हा मूकबधीर एकता असोसिएशनने हे आंदोलन सुरु केले आहे. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अनिकेत सेलगावकर, सचिव शेख मुजाहेद यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.