परभणी महापालिका :शहरातील कचरा विघटन प्रकल्पाचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:09 AM2019-04-25T00:09:33+5:302019-04-25T00:09:55+5:30
शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्रारंभ होईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी प्रस्तावित असलेल्या बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पास प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या सहा महिन्यांमध्ये बोरवंड येथे प्रकल्पास प्रारंभ होईल, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली़
परभणी शहरात जमा होणारा कचरा सद्यस्थितीला धार रोडवरील डम्पींग ग्राऊंडवर टाकला जातो़ मागील काही वर्षांपासून याच ठिकाणी कचºयाची साठवणूक केली जाते़ धार रोड भागात नागरी वसाहती वाढत असून, या ठिकाणच्या कचºयाचा प्रकल्प शहरापासून दूर अंतरावर नेणे गरजेचे झाले होते़ धार रोड परिसरातील डम्पींग ग्राऊंड बंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती़ या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने शहरापासून साधारणत: ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात सहा एकर जमिनीवर कचºयाचा विघटन प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला़ या ठिकाणी कचरा विघटन प्रकल्प सुरू करण्यासाठी विविध विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक होते़ काही दिवसांपूर्वी प्रदूषण महामंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने प्रकल्प सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़
परभणी शहरातील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या ठिकाणी कचºयापासून खत, बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. शहरात निर्माण होणारा दररोजचा कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे, या कचºयाचा पुनर्वापर करणे या कामांना प्राधान्य देत प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध विभागांच्या नाहरक परवानग्यांमुळे सध्या या ठिकाणी काम सुरू झाले नव्हते. मात्र प्रदुषण महामंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळाल्याने आता प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे.
येत्या काही महिन्यांमध्येच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून, परभणी शहरात जमा होणाºया कचºयाचे योग्य विघटन होवून मनपाला आर्थिक उत्पन्नही प्राप्त होण्याची आशा निर्माण झाली आहे़
१०० टन कचºयाचे शहरात संकलन
४परभणी शहरातील कचºयाचे संकलन करण्यासाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या असून, या घंटागाड्यांच्या माध्यमातून दररोज १०० टन कचरा संकलित केला जात आहे़
४सध्या हा कचरा धार रोडवरील डम्पींग ग्राऊंडवर टाकण्यात येत असून, त्यापैकी ३५ टक्के कचरा विलगीकरण करून प्राप्त होतो़ शहरातील घंटागाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, ६९ जुन्या घंटागाड्यांसह नवीन १२ घंटागाड्यांची त्यात भर पडली आहे़
४या घंटागाड्यांना स्वतंत्र मार्ग आखून देण्यात आले आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत घंटागाड्या नियमितपणे फिरत असलयाचे दिसत आहे़
बायोगॅस प्रकल्पाची : होणार उभारणी
४बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्पाच्या ठिकाणी कचºयातून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे़ यासाठी ५ टनाचे दोन प्रकल्प या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आले आहेत़ तसेच मेकॅनिकल कम्पोस्टींग खत तयार करण्याचाही प्रस्ताव आहे़ बोरवंड परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी सुरुवातीला शहरातूनच कचरा विघटन करून नेणे गरजेचे आहे. त्यामुळे कचरा संकलन करतानाच तो वर्गीकरण करुनच संकलन करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
सद्यस्थितीत कचºयाचे विघटन होत नसले तरी लवकरच या अनुषंगाने जनजागृती करून बोरवंड येथे ओला, सुका कचरा आणि इलेक्ट्रॉनिक कचरा, प्लास्टिक वेगवेगळ्या पद्धतीने साठविले जाणार आहे़
बोरवंड येथील कचरा विघटन प्रकल्प हा पर्यावरणपूरक असावा, यावर भर आहे़ त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाला थिक फॉरेस्ट (झाडांचा वेढा) असलेले संरक्षक कुंपन नैसर्गिकरित्या तयार केले जाणार आहे़ जेणे करून या प्रकल्पामधील कचºयाची दुर्गंधी प्रकल्पाबाहेर येणार नाही, यासाठी प्रयत्न आहेत़ येत्या सहा ते सात महिन्यांत प्रत्यक्ष प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करू़
-रमेश पवार, आयुक्त, मनपा