परभणी : वर्षभरातच राष्टÑीय महामार्ग खचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:37 PM2019-06-10T23:37:38+5:302019-06-10T23:37:59+5:30
राष्टÑीय महामार्गाचा दर्जा असलेल्या ढालेगाव-पाथरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्ष होत आहे. वर्षभरातच ढालेगाव जवळ राष्टÑीय महामार्गाचा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला असून वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): राष्टÑीय महामार्गाचा दर्जा असलेल्या ढालेगाव-पाथरी या रस्त्याचे काम पूर्ण होऊन एक वर्ष होत आहे. वर्षभरातच ढालेगाव जवळ राष्टÑीय महामार्गाचा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला असून वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कल्याण ते निर्मल राष्टÑीय महामार्ग २२२ हा पाथर्डी मार्गे बीड जिल्ह्यातील गढी, माजलगाव, पाथरी व परभणी असा जातो. पाथरी तालुक्यातील ढालेगावपासून सुरू होणाऱ्या रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र ढालेगाव येथील गोदावरी पात्रात असलेल्या पुलाचे बांधकाम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूने भराव भरण्याचे काम संथगतीने सुरू आहे. ढालेगाव ते पाथरी ८ कि.मी.चे अंतर असून राष्टÑीय महामार्गावर ढालेगावच्या नजीक वर्षभरातच रस्त्याची वाट लागली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खचला गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. त्याचबरोबर ढालेगाव नजीक रस्त्याच्या बाजूने खोदण्यात आलेल्या नाल्यामुळे गतवर्षी या भागात पावसाचे पाणी साचून बाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
नाल्यातील पाण्याला उतार नसल्याने हा रस्ता खचला गेला आहे. राष्टÑीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे पाच वर्ष असली तरी खचलेल्या रस्त्यावर अद्यापही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. खचलेल्या रस्त्यामुळे या भागात वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. राष्टÑीय महामार्गाच्या अधिकाºयांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
ठेकेदार झाले गायब
४राष्टÑीय महामार्गावर ढालेगाव ते मानवत रोड रेल्वेस्टेशनपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मानवतरोड ते परभणीपर्यंत जाणाºया रस्त्यावर हैदराबाद येथील नवीन एजन्सीला काम देण्यात आले होते. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे खोदण्यात आले. काही ठिकाणी भराव भरण्यात आला.
४गेल्या दोन महिन्यापासून तर या रस्त्यावरील काम पूर्णत: बंद करून ठेकेदार गायब झाला आहे. पर्यायाने पाथरीपासून मानवतरोडपर्यंत १८ कि.मी. अंतरापर्यंत रस्ता पूर्ण झाला. मात्र पुढील २५ कि.मी. रस्ता खराब असल्याने या रस्त्यावरून रहदारी करणे जिकीरीचे बनले आहे.
४दरम्यान, राष्टÑीय महामार्ग असलेल्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम झाल्यानंतर वर्षभरातच हा रस्ता दबला गेला आहे. या रस्त्याचे काम होत असताना संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाºया संबंधित गुत्तेदार, अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.