परभणी : राष्ट्रवादीचा मोर्चा तहसीलवर धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:05 AM2017-11-29T00:05:26+5:302017-11-29T00:05:35+5:30
शेतकºयांचे पीककर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करावा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाथरी तहसील कार्यालयावर राकाँच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : शेतकºयांचे पीककर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करावा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाथरी तहसील कार्यालयावर राकाँच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बाजार समितीच्या प्रांगणातून दुपारी १२ वाजता या मोर्चाला प्रारंभ झाला. आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह माजी खा.सुरेश जाधव, जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अनिलराव नखाते, पंचायत समितीच्या सभापती शिवकन्या ढगे, मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे, नगराध्यक्षा मीनाताई भोरे, सुभाष कोल्हे, एकनाथ शिंदे, सुनील उन्हाळे, चक्रधर उगले, राजेश ढगे, रमेश तांगरे, हतीन अन्सारी, बंडू पाटील शिंदे, पप्पू घांडगे, माधवराव जोगदंड, अलोक चौधरी, राजीव पामे, तुकाराम जोगदंड, नंदाताई राठोड आदी पदाधिकाºयांसह शेतकरी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्याने निघालेला हा मोर्चा सेलू कॉर्नर ते तहसील कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी, माजी खा.सुरेश जाधव यांनी मार्गदर्शन करताना राज्य शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. प्रभारी तहसीलदार निलेश पळसकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये, कापूस, सोयाबिन पिकांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.