परभणी : वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 23:42 IST2018-10-17T23:40:37+5:302018-10-17T23:42:18+5:30
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आॅक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि स्वराज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला.

परभणी : वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ आॅक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि स्वराज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे प्रारंभी पूजन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक घुसळे, महेश कोकड, ज्येष्ठ विक्रेते कचरू काळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अशोक कुंभार, शिवाजी पैठणे, बाबासाहेब गायकवाड, गजानन बोराडे, कैलास करपे, राजेश आमले, नितीन नरवटे, बळीराम जाधव, गजानन देशमुख, गायकवाड, लोंढे, शरद महाजन, एकनाथ मोहिते आदींसह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.