परभणी: एकाही प्रकल्पात शिल्लक नाही पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:15 AM2019-06-25T00:15:46+5:302019-06-25T00:16:16+5:30

जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत.

Parbhani: No water reservoir in any single plant | परभणी: एकाही प्रकल्पात शिल्लक नाही पाणीसाठा

परभणी: एकाही प्रकल्पात शिल्लक नाही पाणीसाठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पाण्याचा साठा शिल्लक नसल्याने परभणीकरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून यंदाच्या पावसाळ्यात प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा होण्यासाठी या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस होण्याची गरज आहे. सध्या तरी सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत.
दोन वर्षापासून पाऊस सरासरी देखील गाठत नाही. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर तर होतच आहे. या शिवाय जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणीपातळीतही सातत्याने घट होत आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के पाऊस कमी झाला. विशेष म्हणजे परतीचा पाऊस झाला नाही. परिणामी परभणी जिल्ह्यात प्रकल्पांची स्थिती नाजूक झाली आहे. जिल्ह्यातील येलदरी, निम्न दुधना या दोन प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचा भार आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात येलदरी प्रकल्पात जेमतेम ९ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पामध्ये ४७ टक्क्यापर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. सहा महिन्यांच्या काळात या दोन्ही प्रकल्पांमधील संपूर्ण पाणीसाठा पिण्यासाठी वापरण्यात आला. मागील वर्षीच्या आॅक्टोबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. या आरक्षणानुसार जून महिन्यापर्यंत परभणी जिल्ह्यातील शहरी भागाला पाणी उपलब्ध झाले आहे.
सद्यस्थितीला पावसाळा सुरु झाला असला तरी प्रकल्पांमध्ये मात्र पाणीसाठा शिल्लक नाही. ९३४ दलघमी क्षमतेच्या येलदरी प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसून या प्रकल्पात मृतसाठ्यात पाणीसाठा आहे. तर सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प ३४४.८०० दलघमी क्षमतेचा असून या प्रकल्पामध्येही उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय करपरा मध्यम प्रकल्प, मासोळी मध्यम प्रकल्प, डिग्रस, मुद्गल, ढालेगाव, मुळी या गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्येही पाणीसाठा शिल्लक नसल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात हे सर्व प्रकल्प पाण्याने भरले तरच पुढील वर्षीच्या उन्हाळ्याची चिंता मिटणार आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असून मान्सूनचा एक हलका पाऊसही जिल्ह्याता झाला आहे. मात्र ६ महिन्यांपासून जिल्ह्यातील जमीन तापलेली असून भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे शनिवारी झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावरुन वाहिले नाही. सध्या शेतकऱ्यांना पेरण्यासाठी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गरज आहे.
निम्न दुधनाच्या पाण्याने जिल्ह्याला तारले
४यावर्षी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने पाणीटंचाई अधिकच गंभीर झाली होती. निम्न दुधना प्रकल्पातच बºयापैकी पाणीसाठा उपलब्ध होता. या प्रकल्पाचे पाणी परभणी, पूर्णा, सेलू या तीन शहरांसह तीनही तालुक्यांमधील अनेक गावांसाठी वापरण्यात आले. त्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाचा या तालुक्यांना हातभार लागला.
४आ.डॉ.राहुल पाटील यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यामुळे निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. परिणामी अनेक गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाºयाचा प्रश्न मिटला. आता या प्रकल्पातही पाणीसाठा शिल्लक नसून पावसाळ्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
मृतसाठ्यात उपलब्ध पाणी
४जिल्ह्यातील एकाही प्रकल्पामध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. सर्वच्या सर्व प्रकल्प मृतसाठ्यात आहेत.
४येलदरी प्रकल्पाच्या मृतसाठ्यात ९१.६२३ दलघमी, निम्न दुधना प्रकल्पात ५५.१९ दलघमी, करपरा मध्यम प्रकल्पात १.५७ दलघमी तर मासोळी मध्यम प्रकल्पामध्ये १.७५ दलघमी पाणी मृतसाठ्यात शिल्लक आहे. इतर चारही बंधारे, झरीचा तलाव आणि २२ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

Web Title: Parbhani: No water reservoir in any single plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.