परभणी: चार तलाठ्यांसह एका शिक्षकास नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 11:23 PM2019-08-06T23:23:57+5:302019-08-06T23:24:25+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कार्यक्रमात गैरहजर असलेल्या चार तलाठी आणि एका शिक्षकाला जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़

Parbhani: Notice to a teacher with four students | परभणी: चार तलाठ्यांसह एका शिक्षकास नोटीस

परभणी: चार तलाठ्यांसह एका शिक्षकास नोटीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कार्यक्रमात गैरहजर असलेल्या चार तलाठी आणि एका शिक्षकाला जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़
विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे़ त्याचवेळी प्रशासकीय यंत्रणाही या निवडणुकीच्या तयारीत गुंतली आहे़ त्यामध्ये परभणी जिल्ह्यात निवडणुकीच्या पूर्व तयारीचा भाग म्हणून शहरातील कल्याण मंडपम् येथे ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू करण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यात असलेल्या जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी या चार विधानसभा मतदार संघात १ हजार ५०८ मतदान केंद्र राहणार आहेत़ या मतदान केंद्रांवर २ हजार १७० बॅलेट युनिट आणि १ हजार ६८० कंट्रोल युनिट लागणार आहेत़ तर १ हजार ८४० व्हीव्हीपॅट यंत्र आवश्यक राहणार आहेत़ हे यंत्र तामिळनाडूतील चेन्नई आणि धर्मापूर येथील प्राप्त होणार आहेत़
कल्याण मंडमप् येथील सभागृहात ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कामासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ यामध्ये उपजिल्हाधिकारी सुकेशिनी पगारे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रथमस्तरीय तपासणीसाठी उपस्थित आहेत़ या प्रथमस्तरीय तपासणी कामासाठी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यातील सेलू येथील तलाठी अशोक भंवर, आऱआऱ वाव्हळे, भारत ढवळे, सेलू येथील प्राथमिक शिक्षक एम़व्ही़ चोकनपुरे आणि गंगाखेड येथील तलाठी गजानन फड हे कर्मचारी अनुपस्थित राहिले़ या पाचही कर्मचाºयांना जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़
राजकीय पक्षांना उपस्थितीचे आवाहन
च्शहरातील कल्याण मंडमप् येथे ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी सुरू आहे़ ही प्रथमस्तरीय तपासणी पारदर्शकरित्या सुरू आहे़ या तपासणीस जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी केले आहे़
च्भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमस्तरीय तपासणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ त्याचवेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे़ या ठिकाणी अग्नीशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली असल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी सांगितले़
च्प्रथमस्तरीय तपासणीस निवडणूक विभागाने जवळपास ९० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे़ ही प्रक्रिया आणखी २० ते २२ दिवस चालणार आहे़ प्रथमस्तरीय तपासणीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी या ईव्हीएम मशीन त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या ताब्यात दिल्या जाणार आहेत़ तेथून रँडमायझेशनद्वारे मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोहचविल्या जाणार आहेत़
भाजपा, ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी दिली भेट
च्ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी सुरू आहे़ या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भेट देवून प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया समजावून घेतली़ इतर पक्षांनीही प्रक्रिया समजून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

Web Title: Parbhani: Notice to a teacher with four students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.